अतिक्रमणधारकास ग्रामविकास अधिकाऱ्याचे पाठबळ

By Admin | Updated: December 26, 2015 01:25 IST2015-12-26T01:25:01+5:302015-12-26T01:25:01+5:30

ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने अतिक्रमणाधारकाला सहकार्य करीत ते काढल्याची खोटी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

Encroachment by the Rural Development Authority | अतिक्रमणधारकास ग्रामविकास अधिकाऱ्याचे पाठबळ

अतिक्रमणधारकास ग्रामविकास अधिकाऱ्याचे पाठबळ

शासनाची दिशाभूल : कारवाईसाठी सिद्दीकी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
घुग्घुस: ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने अतिक्रमणाधारकाला सहकार्य करीत ते काढल्याची खोटी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. कर्तव्यास कसूर करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यास कारवाई करण्याची मागणी इबादूल हसन सिद्दीकी यांनी केली आहे.
ग्रामपंचायतीच्या सिमेंट काँक्रिट रस्त्यावर शेख मुशीम शेख यांचे घर आहे. त्यांनी सिमेंट रस्त्यावर वॉलकंपाऊंडचे बांधकाम केले. अतिक्रमणाबाबत १५ एप्रिल २०१३ रोजी ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आली. मात्र, ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविण्याऐवजी अतिक्रमणधरकास प्रोत्साहन दिले. त्यामुळे हे प्रकरण सिद्दीकी यांनी लोकशाही दिनात ठेवले. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. चंद्रपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनंत पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रस्त्यावर अतिक्रमण असल्याचा अहवाल सीईओंकडे सादर केला. त्यानंतर सीईओंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. अहवालानुसार अतिक्रमण काढण्याचे आदेश ग्रामपंचायतीचे गटविकास अधिकारी यारेवार यांना दिले. सात दिवसात अतिक्रमण हटवून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र त्यांनी अतिक्रमण न हटविता ते हटविण्याची खोटी माहिती वरिष्ठांकडे सादर केली. याच्या आधारे सीईओनी प्रकरण निकाली निघाल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी ते पत्र सिद्दीकी यांंना पाठविले. तेव्हा हा सारा प्रकार उजेडात आला, असे सिद्दिकी यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: Encroachment by the Rural Development Authority