शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांची निवासस्थाने ओस

By admin | Updated: June 20, 2017 00:31 IST

शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने निवासस्थाने बांधून दिलेली आहे.

अनेकांकडून आदेशाची अवहेलना : मुख्यालयी राहण्याचा नियम बासनातलोकमत न्यूज नेटवर्कसावली : शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने निवासस्थाने बांधून दिलेली आहे. मात्र याचा उपयोग अपवादानेच केला जातो. प्रामुख्याने आरोग्य सेवेअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी ही सोय करून दिली आहे. त्याचा मात्र वापरच केला जात नाही. ही निवासस्थाने ओस पडलेली आहे. संबंधित प्रशासनाचेही दुर्लक्ष असल्याने लाखो रुपयांची मालमत्ता अडगळीत पडली आहे. संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारीच मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे त्यांच्या अधिनस्त कर्मचारीही सोईच्या ठिकाणावरून ये-जा करतात. तहसील, पंचायत समिती या कार्यालयाशी प्रत्येक नागरिकांचा संबंध येतो. तालुका प्रशासनातील हे महत्वाचे घटक आहे. आरोग्य विभाग हा अतिशय संवेदनशील विभाग आहे. या सर्व कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बहुतांश ठिकाणी कार्यालय परिसरातच सुसज्ज अशी निवासस्थाने बांधून देण्यात आली आहे. लाईट, पाणी आदी आवश्यक त्या सुविधा या ठिकाणी करून देण्यात आलेल्या आहे. यानंतरही बहुतांश कर्मचारी या वास्तूचा उपयोग करीत नाही. कार्यालयीन कामकाजाची वेळ सुरू झाल्यानंतर किती तरी वेळाने अधिकारी-कर्मचारी कार्यालयात दाखल होतात. काम लवकर होऊन त्याच दिवशी गावी परत जावे, या उद्देशाने सकाळी गावातून निघालेल्या नागरिकांना कर्मचाऱ्यांची तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. कर्मचारी उपलब्ध झाले तर अधिकाचाऱ्यांची वाट पहावी लागते. या प्रकारात त्यांचा संपूर्ण दिवस वाया जातो. तलाठी आणि ग्रामसेवक हे नशिबानेच उपलब्ध होतात. त्यांच्यासाठी असलेल्या कार्यालयात कधीही सापडत नाही. संपूर्ण दिवसभर ते तालुका मुख्यालय परिसरातच आढळून येतात. गरज असलेले नागरिक त्यांचा शोध घेत तालुक्याचे ठिकाण गाठतात. तरीही त्यांची कामे वेळेत होत नाही. तालुक्याच्या आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू केला आहे. तालुक्यासह ग्रामीण भागात असलेल्या आरोग्य केंद्र, उपकेंद्रात कर्मचारी राहत नाही. त्यांच्यासाठी बांधून देण्यात आलेली निवासस्थाने निरुपयोगी ठरत आहे. आरोग्य सेवा तत्काळ उपलब्ध होत नसल्याने गरजूंना जिल्ह्याचे ठिकाणी गाठावे लागत आहे. या प्रकारात त्यांचा वेळ आणि पैसा व्यर्थ ठरत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षचंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहात नाही.त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. ही बाब तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडूनही दुर्लक्षित आहे. एखाद्या कर्मचाऱ्यांविषयी त्यांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर कारवाई अपवादानेही झाली नाही. मात्र संबंधितावर काय कारवाई झाली. हे विचारण्याचे सौजन्य त्यांच्याकडून दाखविले जात नाही. तालुक्याच्या ग्रामीण भागातील शाळा विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद पडत आहे. तरीही शिक्षकांना गावात राहून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे, असे कधी वाटले नाही. ग्रामीण शाळांप्रती त्यांची आस्था नसल्याचे स्पष्ट होते.