शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तालुका खरेदी विक्री संघाची आज निवडणूक

By admin | Updated: March 16, 2016 08:35 IST

तालुक्यातील अनेक दिग्गजांच्या उमेदवारीने चर्चेचा विषय बनलेली येथील तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक १६ मार्च रोजी होत आहे.

दिग्गजांच्या उमेदवारी : निवडणूक ठरणार लक्षवेधीनागभीड : तालुक्यातील अनेक दिग्गजांच्या उमेदवारीने चर्चेचा विषय बनलेली येथील तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक १६ मार्च रोजी होत आहे. या निवडणुकीत दोन पॅनल परस्परासमोर उभ्या ठाकल्याने नेमके कोणते पॅनल बाजी मारेल, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष्य वेधले आहे.या खरेदी विक्री संघाचे कार्यक्षेत्र संपूर्ण तालुका असले तरी सर्वसाधारण गटात २७२ तर सेवा सहकारी गटात २७ मतदार आहेत. यातही सर्वसाधारण गटातील २० ते २५ मतदार मय्यत असल्याची माहिती असून मतदार कमी असल्याने या निवडणुकीत अतिशय चुरस निर्माण झाली आहे.या निवडणुकीत तालुक्यातील अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक आणखीच लक्ष्यवेधी ठरली आहे. चंद्रपूर जि.प. चे माजी उपाध्यक्ष व चंद्रपूर जि.म. बँकेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. दिगंबर गुरुपुडे, बँकेचे माजी उपाध्यक्ष शांताराम देशमुख, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक गजानन पाथोडे, माजी जि.प. सदस्य चांगदेव कामडी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक मोरेश्वर पिल्लेवान, पुरुषोत्तम राऊत, गिरगावचे युवा कार्यकर्ते विनोद बोरकर यांच्या उमेदवारीने ही निवडणूक आणखी चर्चेत आली आहे.परस्परांसमोर उभ्या ठाकलेल्या दोन पॅनलपैकी एका पॅनलचे नेतृत्त्व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गजानन पाथोडे हे करीत आहेत, तर दुसऱ्या पॅनलचे नेतृत्त्व शांताराम देशमुख करीत आहेत. यात उल्लेखनीय असे की, खविसंचे कार्यक्षेत्र संपूर्ण तालुका कार्यक्षेत्र असले तरी तालुक्यातील काही काही गावातच मतदारांची संख्या अधिक आहे. (तालुका प्रतिनिधी)या खरेदी विक्री संघावर २००६ पासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून या संस्थेचा कारभार प्रशासकच बघत आहेत. प्रदीर्घ म्हणजे १० वर्षानंतर या संस्थेच्या अध्यक्षपदासाठी अनेकजण आस ठेवून आहेत.या संस्थेतून जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी एक प्रतिनिधी पाठविण्यात येतो. त्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो. जिल्ह्यात असे मोजके मतदार असतात. या प्रतिनिधीसाठीसुद्धा हा आटापिटा असल्याची खमंग चर्चा आहे.