शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

एकार्जुना पालावर २५ विद्यार्थी शाळाबाह्य

By admin | Updated: March 19, 2016 00:48 IST

‘स्कूल चले हम’, ‘चला शिकू या, पुढे जाऊ या’, ‘साक्षरता मिशन’, ‘सर्व शिक्षा अभियान’ अशी कितीतरी शासकीय मिशनस् आहेत.

योजना फसव्या : पालावर अशिक्षितांचे प्रमाण अधिकविनेशचंद्र मांडवकर नंदोरी ‘स्कूल चले हम’, ‘चला शिकू या, पुढे जाऊ या’, ‘साक्षरता मिशन’, ‘सर्व शिक्षा अभियान’ अशी कितीतरी शासकीय मिशनस् आहेत. यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधीचा खर्च करते. मात्र शिक्षणापासून वंचित असलेली मुले या अभियानाला आव्हान देणारी ठरत असल्याचा प्रत्यय नंदोरी जवळील एकार्जुना येथे असलेल्या भटक्यांच्या पालावरून येत आहे.१२ वर्षाच्या इमामदीने ही वास्तविकता प्रकाशात आणली असून एकार्जुना पालावर आजही २० ते २५ मुले शाळा व शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. नंदोरीनजीक असलेल्या विस्लोन येथे मूर्ती, विळ्या विक्रीसाठी ही मुलगी आली असता प्रस्तुत प्रतिनिधीने तिला बोलते केले.कर्नाटक राज्यातील जिल्हा गुलबर्गा तालुका चिंचोली व गाव कोटगा. कर्नाटकातील कोटगा हे तिचे गाव आहे. वंशपरंपरेने मूर्ती व पावश्या तयार करणे. ते विकून उदरनिर्वाह करणे व पोटाची खडगी भरण्यासाठी गावोगाव भटकणे हा त्यांचा व्यवसाय. इमामदी खासिम अली शेख हे तीचं पूर्ण नाव आहे. तिला कोणत्या शाळेत शिकते असे विचारले असता शिकत नसल्याची ती सांगते. पांढरपेशांची तिला भीती वाटते. पालावरील रबू, अशरूफ, आरीफा, इनाम व अबू तसेच २०-२५ मुले शाळेत जात नाहीत व पूर्णता निरक्षर असल्याची माहिती तिचे मेहुणे इब्राहीम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.