भद्रावतीत पाच दुचाकीस्वारांसह आठजण दारूसह अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:29 IST2021-05-11T04:29:28+5:302021-05-11T04:29:28+5:30

भद्रावती : शहरातील गवराळा रेल्वे क्रॉसिंग पुलाजवळ अवैधरित्या दारूची वाहतूक करत असताना पाच दुचाकीस्वारांसह आठजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ...

Eight arrested in Bhadravati along with five two-wheelers | भद्रावतीत पाच दुचाकीस्वारांसह आठजण दारूसह अटकेत

भद्रावतीत पाच दुचाकीस्वारांसह आठजण दारूसह अटकेत

भद्रावती : शहरातील गवराळा रेल्वे क्रॉसिंग पुलाजवळ अवैधरित्या दारूची वाहतूक करत असताना पाच दुचाकीस्वारांसह आठजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार लाख ६० हजारांचा मुहेमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली. करण भास्कर मिटपल्लीवार (२५), गोलू टिल्लू मक्केवार (२२), मालनबाई भास्कर मिटपल्लीवार (५०, रा. गवराळा भद्रावती), कार्तिक दिलीप वनकर (२२), मयूर गजानन बल्लूरवार (१८), केवल सरोज गौरकार (१८, रा. वणी, जि. यवतमाळ), महेश महादेव समर्थ (२८), किसन गणपत बावणे (२२, रा. बल्लारशा) अशी आरोपींची नावे आहेत. वणीमार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्याआधारे गवराळा रेल्वे क्रॉसिंग पुलाजवळ पोलिसांनी सापळा रचला. यावेळी पोलिसांनी पाच दुचाकींसह देशी-विदेशी दारूसाठा असा चार लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध विभागप्रमुख अमोल तुळजेवार, केशव चीटगिरे, निकेश ढेंगे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.

Web Title: Eight arrested in Bhadravati along with five two-wheelers