शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उत्पादनातून साधली आर्थिक उन्नती

By admin | Updated: June 29, 2014 23:50 IST

सततच्या नापिकीने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे सध्या तरी शेती व्यवसाय हवामानाच्या लहरीपणामुळे धोक्यात आला आहे. असे असतानाही एका शेतकऱ्याने रेशीम उत्पादनाची शेती

प्रवीण खिरटकर - वरोरासततच्या नापिकीने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे सध्या तरी शेती व्यवसाय हवामानाच्या लहरीपणामुळे धोक्यात आला आहे. असे असतानाही एका शेतकऱ्याने रेशीम उत्पादनाची शेती करीत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आणि त्यातून चांगला नफा मिळविला. रेशीम शेती आपल्या परिसरात घेऊन भरघोस उत्पादन घेण्याची किमया करीत या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. धानोली येथील राहुल विधाते व प्रसाद विधाते या दोघा भावंडांनी त्यांच्या शेतात अनेकविध प्रयोग केले आहेत. त्यात कुक्कुटपालन, फळबाग, प्रायोगिक तत्वावर मका उत्पादन, वन शेतीचा समावेश आहे. यावर्षी प्रथमच त्यांनी एका एकरात रेशीमचे उत्पादन घेतले. त्यासाठी शेतात टिनाचे एक शेड उभारले. वर्धा जिल्ह्यातून तुतीच्या कलमा आणून एक एकरात त्या लावण्यात आल्या. ७५ ते ९० दिवसांत या कलमांचे आता झाडात रुपांतर होवून त्याला मोठ्या प्रमाणात पालव्या फुटल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातून रेशीम किड्यांची अंडी आणली. ती अंडी तुतीचे पाणे तोडून त्यात ठेवल्या जातात. त्यानंतर अंडीमधून अळ्या बाहेर येतात. त्या अळ्यांना तुतीची कोवळी पाने खाण्यासाठी देण्यात येतात. कोवळी पाने १४ दिवसांपर्यंत दिल्यानंतर या अळ्यांना एक दिवस उपाशी ठेवण्यात येते. त्या अळ्या २१ दिवसांत कोश तयार करतात. हा कोश दोन दिवसांत विक्रीसाठी घेवून जावे लागते. कोशामधून अंडी बाहेर गेल्यास कोशाचे वजन घटते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. वर्षभरातून तीनवेळा उत्पादन मिळते. एका एकरात एक क्विंटल कोश तयार होतो. यामध्ये अंडी व तुतीच्या कलमांची किंमत अत्यल्प आहे. फक्त प्रक्रिया करण्यासाठी टिनाचे शेड एकदा उभारावे लागते. त्यासाठीच खर्च येतो. उत्पादन खर्च अत्यल्प असल्याने मोठ्या प्रमाणात रेशीमच्या उत्पादनातून नफा होत असतो. मोठ्या प्रमाणात उत्पादन राहिल्यास व्यापारी स्वत: शेतावर येवून खरेदी करीत असतात. महाराष्ट्रात १७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात रेशीमला कमी भाव आहे. अशी खंत प्रसाद विधाते यांनी व्यक्त ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.