शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धुळीने अर्धे ब्रह्मपुरीकर त्रस्त

By admin | Updated: May 11, 2015 01:12 IST

कोट तलावाच्या सौंदर्यीकरणाला ‘लोकमत’च्या दणक्याने वेग आला आहे.

ब्रह्मपुरी : कोट तलावाच्या सौंदर्यीकरणाला ‘लोकमत’च्या दणक्याने वेग आला आहे. तलावातील उपसा केलेली माती १ किमी अंतरावर काहाली रोडवर महसूलच्या जमिनीवर खड्यात फेकण्याचे काम सुरू आहे. परंतु, माती फेकण्याचे काम खुल्या टिप्परद्वारे केले जात असल्याने माती डांबरीरस्त्यावर पडत आहे. त्यामुळे धुळीने शहर ग्रासले असून अर्ध्या ब्रह्मपुरीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चार कोटी पन्नास लाख रूपये खर्च करून तलाव सौंदर्यीकरण करण्याचे काम थंडबस्त्यात होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. या वृत्ताने प्रशासनाला जाग आली आणि दखल घ्यावी लागली. लगेच गाळ उपसा करण्यासाठी कंत्राटदाराला अधिक निधी मंजूर केल्याने कामाला गती मिळाली. तलावामधील खराब गाळ उपसा करण्यासाठी टिप्पर व जेसीपी लावून उपसा केल्या जात आहे. परंतु, ज्या टिप्परने हा गाठ उपसा करून दूरवर फेकला जात आहे, त्या दरम्यान डांबरीरस्त्यावर डांबराच्या ऐवजी मोठ्या प्रमाणात माती पडली आहे. मातीचे थर एकावर एक बसून वाहन गेल्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्यामुळे सौंदर्यीकरण तलावाचे जरी होत असले तरी टिळकनगर, वाल्मीकनगर, विद्यानगर, महाविद्यालय परिसर, गांधीनगर, शारदा कॉलनी येथील नागरिकांचे आरोग्य धुळीमुळे धोक्यात आले आहे. संबंधित कंत्राटदार मातीची उचल ज्या टिप्परने करीत आहे, ते टिप्परचा मागील भाग खुले आहेत. त्यामुळे टिप्परमधून माती रस्त्यावर पडत असून कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)कंत्राटदाराचे दुर्लक्षमुख्य कंत्राटदाराने तलावाचे काम अनेकांवर सोडून दिल्याने कामात योग्यता दिसून येत नाही. हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा असून तलाव सौंदर्यीकरणाच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल होत असल्याचे बोलले जात आहे.