शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात १५ जणांनी केले प्लाझ्मा दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 05:00 IST

कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिक  भयभीत झाले आहेत. मात्र, कोरोना आजारातून बरे होता येते. रुग्णांनी तसेच नातेवाईकांनी घाबरू नये. असे आवाहन वारंवार केले जात आहे. दरम्यान, गंभीर रुग्णांना प्लाझ्मा दान देवून यातून बरे करता येते. यासाठी कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. मात्र, पाहिजे तसे नागरिक यासाठी पुढे येत नसल्याने रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. हजारे यांनी आपल्या  प्लाझ्मा दान केला आहे.

ठळक मुद्देनवा आदर्श : रक्त संक्रमण अधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्त संक्रमण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डाॅ. अनंत हजारे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्लाझ्मा दान करीत नवा आदर्श निर्माण केला आहे. कोरोनातून बरे झालेल्या अधिकाधिक नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये तब्बल १५ जणांनीही प्लाझ्मा दान केला आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिक  भयभीत झाले आहेत. मात्र, कोरोना आजारातून बरे होता येते. रुग्णांनी तसेच नातेवाईकांनी घाबरू नये. असे आवाहन वारंवार केले जात आहे. दरम्यान, गंभीर रुग्णांना प्लाझ्मा दान देवून यातून बरे करता येते. यासाठी कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. मात्र, पाहिजे तसे नागरिक यासाठी पुढे येत नसल्याने रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. हजारे यांनी आपल्या  प्लाझ्मा दान केला आहे. विशेष म्हणजे, त्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये कोरोनाची लागण झाली होती. यावर मात करून त्यांनी पुन्हा आपले कार्य सुरू केले.  त्यानंतर  अधिकाधिक नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी जनजागृती सुरू केली. यावेळी विकृती शास्त्र विभागप्रमुख डाॅ. सुरेश जांभूळकर, नाक, कान, घसा विभागप्रमुख डाॅ. देवेंद्र माहूरे, बालरोगतज्ज्ञ डाॅ. सरिता हजारे, समाजसेवा अधीक्षक संजय गावित, पंकज पवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी वर्षा देशमुख आदींची उपस्थिती होती. प्लाझ्मा घेण्याचे काम  रक्तपेढी वैद्यानिक अधिकारी जयवंत पचारे यांनी केले. 

४० वर्षांपासून रक्तदानयेथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रक्तसंक्रमण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डाॅ. अनंत हजारे यांनी मागील ४० वर्षांपासून वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. तो अद्यापही सुरूच आहे. यावर्षी त्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. 

प्लाझ्मा दानमुळे वाचला रुग्णांचा जीवकोरोनाच्या या महामारीने गंभीर रुग्णांना वाचविण्यासाठी प्लाझ्मा दिला जातो. मागील काही दिवसांमध्ये येथील रुग्णालयात कोरोनातून बरे झालेल्या १५ जणांनी प्लाझ्मा दान करून अन्य रुग्णांचा जीव वाचविला आहे.

घाबरू नका, प्लाझ्मा दान करा प्लाझ्मा दान करण्यासाठी आजही नागरिक घाबरत आहेत. मात्र घाबरू नका, यातून कोणताही त्रास होत नसल्याचे स्पष्ट करून शरीरातील केवळ प्लाझ्मा घेतला जातो. यामुळे कोणताही त्रास किंवा कमजोरी येत नाही. ही सोपी पद्धत असून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्रथम रक्तकेंद्रात केवळ ५ एम.एल. रक्त द्यावे लागते. त्यानंतर रक्त तपासणीकरिता पाठवून त्यांच्या रक्तातील रोगप्रतिकारशक्तीची चाचणी केली जाते. चाचणी केल्यानंतर प्लाझ्मा देता येते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या