शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यापाड्यातील घाणमाकड झाल्या लुप्त !

By admin | Updated: March 13, 2016 01:06 IST

होळी आली की गावात दिसणाऱ्या घाणमाकडी आता दिसेनाशा झाल्या आहेत. आजच्या पिढीला एखाद्या चित्रामध्येच या घानमाकडीचे दर्शन घडत आहे.

परंपरा जोपसण्याची गरज : नव्या पिढीला घाणमाकडच ठाऊक नाहीघनश्याम नवघडे नागभीडहोळी आली की गावात दिसणाऱ्या घाणमाकडी आता दिसेनाशा झाल्या आहेत. आजच्या पिढीला एखाद्या चित्रामध्येच या घानमाकडीचे दर्शन घडत आहे.साधारणत: ३० ते ३५ वर्षा अगोदर घाणमाकडही खेड्यातील मुलांचे मनोरंजनाचे प्रमुख साधने होती. उन्ह्याळ्यात मुलांना अभ्यासाचे टेंशन नसते, बहुतेक वेळ फावला असतो. त्याकाळी टी.व्ही. मोबाईल आजच्यासारखे नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परंपरागत खेळांमधूनच मनोरंजन करावा लागत असे.पण आता काळ बदलला आणि काळाबरोबर मनोरंजनाच्या व्याख्यासुद्धा बदलल्या. परंपरागत खेळणी तसेच मनोरंजनाची साधने कालबाह्य झाली. त्यांची जागा आता टीव्ही, मोबाईल यासारख्या आधुनिक साधनांनी घेतली आहे. याचाच परिणाम म्हणून होळीनंतर प्रत्येक खेड्यात दिसणारी घानमाकड आता कालबाह्य नाही तर दिसेनाशी झाली आहे.उन्ह्याळ्याची चाहूल लागताच गावातील काही प्रमुख ‘पोरं’ एकत्र यायची. जंगलात किंवा शेतात जावून धनुष्य बाणाच्या आकाराचा लाकुड आणायचे. मधोमध त्याला एक छिद्र पाडायचे आणि गाातील चौकात एक खांब गाडून त्यावर ही घानमाकड लावायची. दिवसा एखाद्या झाडाखाली तर रात्री एखाद्या चौकात या घानमाकडींचा आवाज सुरूच असायचा. दोन बाजुला दोघे बसले की, आळीपाळीने दोघे झोके द्यायचे आणि त्यांना दम भरेपर्यंत हे झोके सुरूच राहचे. दम भरल्यानंतर ते उतरायचे आणि नंतर दुसरे चढायचे. काही टारगट मुले आजुबाजूच्यांना त्रास व्हावा म्हणून कर्कश आवाज करण्यासाठी घानमाकडीच्या छिद्रामध्ये मुद्दाम सागरगोट्या किंवा वाघनख टाकायचे.पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये गुरांची बैठक शेतातील एखाद्या आंबराईत किंवा एखाद्या मोठ्या झाडात असायची. गुरांनी बैठक घेतली की गुराखी हटकून घानमाकडीचा खेळ खेळायचे. पण आता तेव्हढी गुरेही राहिली नाहीत आणि घानमाकडीचा खेळही उरला नाही.आजच्या पिढीला घानमाकड हा शब्द विचित्र वाटेल. पण घानमाकडीवर झोके घेण्यात जो आनंद व्हायचा, तो अवर्णनीय होता. मी हा अनुभव घेतला आहे. पण आज घानमाकड कुठेच दिसत नाही.- प्रा. डॉ. अनिल कोरपेनवार