शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ विरूद्ध जिल्हा शल्यचिकित्सक २४ तास ‘अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

‘तुमच्यासाठी आम्ही सेवेत आहोत, तुम्ही घरीच राहून आम्हाला सहकार्य करा’ असे म्हणत कोरोनाच्या या युद्धात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस सेवा देत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व मार्ग बंद असल्याने अशा कालावधीत आरोग्य यंत्रणा कुठेही कमी पडू नये, कोरोना संशयित रूग्णांच्या तपासण्या करणे, रूग्णालय आणि होम क्वारंटाईन करत असताना नियमित आरोग्यसेवेकडेही विशेष लक्ष देणे अत्यावश्यक ठरते.

ठळक मुद्देसंडे अ‍ँकर। आरोग्य तपासण्या वाढविण्यावर भर, एक्शन प्लॉन तयार

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘तुमच्यासाठी आम्ही सेवेत आहोत, तुम्ही घरीच राहून आम्हाला सहकार्य करा’ असे म्हणत कोरोनाच्या या युद्धात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस सेवा देत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व मार्ग बंद असल्याने अशा कालावधीत आरोग्य यंत्रणा कुठेही कमी पडू नये, कोरोना संशयित रूग्णांच्या तपासण्या करणे, रूग्णालय आणि होम क्वारंटाईन करत असताना नियमित आरोग्यसेवेकडेही विशेष लक्ष देणे अत्यावश्यक ठरते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे प्रमुख शिलेदार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड हे मोठ्या हिंमतीने लढा देत आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रूग्ण आढळला नाही. परंतु यापुढेही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार तपासण्या वाढविण्यात आल्या.यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड म्हणाले, सकाळी आठ वाजपासूनच माझा व सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा दिनक्रम सुरू होतो. सकाळी रूग्णालयातील विलगीकरण कक्ष, सर्व वार्डांची पाहणी करून सूचना दिल्या जातात. संशयित रूग्णांच्या तपासण्यांकडे विशेष लक्ष आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियमित बैठक होते. राज्यस्तरीय वरिष्ठांसोबत ठरल्याप्रमाणे व्हीसी होते. नवीन गाईडलाईन आल्यास त्यानुसार लगेच निर्णय घेतले जातात, असेही त्यांनी सांगितले.आरोग्य यंत्रणा ‘अपडेट’कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागातील तृतीय व चतुर्थ कर्मचाºयांचे प्रशिक्षणही सुरू आहे. कर्मचाºयांच्या नियुक्त्या करून कामाच्या वेळा ठरविणे, सुरक्षेसाठी सामग्री, होम क्वारंटाईनमधील सर्वांची माहिती घेणे, खासगी रूग्णालयांत पर्यायी व्यवस्था उभारणे, वैद्यकीय अहवालांचा फिडबॅग घेणे, रूग्णवाहिकांच्या नोंदी घेणे, कोरोना ‘कंट्रोल रूम’ समन्वय ठेवणे यासह सर्व आघाड्यांवर आरोग्य यंत्रणा अपडेट केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी दिली.कुणालाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याकरिता आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सध्या तरी एकही पॉझिटीव्ह नाही. मात्र, रूग्ण आढळलाच तर तात्काळ काय करायचे, याचा अत्याधुनिक आराखडा तयार ठेवण्यात आला आहे.-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक चंद्रपूरफेव्हर क्लिनिक सुरूसर्व प्रकारच्या तापांची तपासणी करण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात फेव्हर क्लिनिक सुरू झाले. प्रशिक्षित कर्मचाºयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. कोरोनाचा संसर्गच होऊ नये, यादृष्टीने स्टन्डर्ड आॅपरेटींगनुसार आरोग्यसेवा दिली जात आहे.दोन खासगी रूग्णालये अधिग्रहितकोरोनाच्या प्रतिकारासाठी क्राईस्ट हॉस्पिटल व विमलादेवी आयुर्वेदीक महाविद्यालयाचे रूग्णालय प्रशासनाकडे अधिग्रहित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये कोव्हीड हेल्थ सेंटर सुरू करण्या आले आहे. आयुवैदिक महाविद्यालयातही कोरोना प्रतिबंधासाठी अत्याधुनिक आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर