शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्‍हा रुग्‍णालयाला १५ एनआयव्‍ही, दोन मिनी व्‍हेंटिलेटर्स उपलब्‍ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST

सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यात आरोग्‍य यंत्रणा कमी पडत आहे. व्‍हेंटिलेटर व ...

सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यात आरोग्‍य यंत्रणा कमी पडत आहे. व्‍हेंटिलेटर व ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत केंद्रीय मंत्री व ज्‍येष्‍ठ भाजपा नेते नितीन गडकरी यांच्‍या सहकार्याने १५ एनआयव्‍ही अर्थात नॉन इन्‍व्‍हासिव्‍ह व्‍हेंटिलेटर्स आणि दोन मिनी व्‍हेंटिलेटर्स जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयातील रुग्‍णांसाठी उपलब्‍ध केले आहे.

शुक्रवारी १५ एनआयव्‍ही आणि दोन मिनी व्‍हेंटिलेटर्स आ. मुनगंटीवार यांच्‍या उप‍स्थितीत जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. राठोड यांना सुपूर्द करण्‍यात आले. कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या, वाढता मृत्‍यूदर या चिंताजनक वातावरणात प्रामुख्‍याने व्‍हेंटिलेटर्सची कमतरता, ऑक्‍सिजनचा तुटवडा आदी समस्‍यांनी भर घातली आहे. अनेक रुग्‍णांच्‍या नातेवाईकांनी आ. मुनगंटीवार यांच्‍याकडे तक्रारी केल्‍या असता त्यांनी तातडीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍याशी संपर्क साधला व व्‍हेंटिलेटर्स उपलब्‍ध होण्‍याबाबत विनंती केली.

ना. गडकरी यांनीसुद्धा तत्‍परतेने होकार देत यासंदर्भात तोडगा काढला. १५ नॉन इन्‍व्‍हासिव्‍ह व्‍हेंटिलेटर्स व दोन मिनी व्‍हेंटिलेटर्स तातडीने चंद्रपूरला रवाना केले. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, महानगर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, राजेंद्र गांधी, स्‍थायी समिती सभापती रवी आसवानी, उपमहापौर राहुल पावडे, अंजली घोटेकर, सुभाष कासनगोट्टुवार, ब्रिजभूषण पाझारे आदी उपस्थित होते.