शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचतगटांना सतरंजीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

विनयभंगाच्या आरोपीवर ॲट्रोसिटी दाखल करा चंद्रपूर : महिला आरएफओ विनयभंग प्रकरणातील वनअधिकारी शरद करे यांच्यावर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हे दाखल करून ...

विनयभंगाच्या आरोपीवर ॲट्रोसिटी दाखल करा

चंद्रपूर : महिला आरएफओ विनयभंग प्रकरणातील वनअधिकारी शरद करे यांच्यावर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली आहे. यावेळी अतुल कोडापे, श्रीरंग मडावी, प्रकाश मडावी, विजय किन्नाके आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची पेपरलेसकडे वाटचाल

चंद्रपूर : ग्रामपंचायतीच्या कामात गतिमानता, एकसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने आपले सरकार योजनेत ई-ग्रामसॉफ्ट ही संगणक प्रणाली तयार केली आहे. आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत ई-ग्रामसॉफ्ट प्रणालीतून सर्व १ ते ३३ नमूने ऑनलाइन देण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायती पेपरलेस होण्याच्या मार्गावर आहेत.

रामनगर येथे सुश्राव्य कीर्तन

चंद्रपूर : ज्येष्ठ नागरिक संघ रामनगरतर्फे तुकडोजी महाराज यांचे आजीवन प्रचारक डॉ.श्री. उद्धवराव गाडेकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी त्यांनी सोप्या मराठी भाषेत ग्रामगीताचे विविध दाखले देऊन जनजागृती केली. प्रास्ताविक महादेवराव पिंपळकर तर आभार माणिकराव अंधारे यांनी केले. यावेळी डॉ.दाभेरे, आगलावे, भांडारकर, गोसाई बलकी आदी उपस्थित होते.

आरती दाचेवार यांना आचार्य पदवी

चंद्रपूर : येथील आरभी यशवंत दाचेवार यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नुकतीच आचार्य पदवी देऊन सन्मानित केले. ‘समाजशास्त्र विषयातील असंघटित कामगारांच्या समस्या’ यावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना डॉ.सुलभा गावंडे-खळवतकर यांचे मार्गदर्शन लाभले.

ताेट्यांअभावी पाणी वाया

चंद्रपूर : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत. नगरपरिषदेने नळधारकांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

दुधाळ गाईंचे वाटप करा

चंद्रपूर : जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, बऱ्याचशा पशुपालकांकडे हडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांना दुधाळ गाईचे वाटप करावे, अशी मागणी हाेत आहे.

रोहित्रांचा धोका वाढला

चंद्रपूर : ग्रामीण, तसेच शहरातील बहुतांश शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने लक्ष घालून राेहित्र हटवावे, अशी मागणी हाेत आहे.

अन्नपदार्थांची विक्री थांबविण्याची मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांत काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले, तरी काही ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे, आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सिग्नल बंदमुळे वाहतूक विस्कळीत

चंद्रपूर : शहरातील मिलन चौक, तसेच इतर काही चौकांतील वाहतूक दिवे बंद असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. याकडे वाहतूक शाखेने लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, गांधी चौकाकडे येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने येथे नेहमी वाहतूककोंडी होत आहे. पोलीस प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी सिग्नल सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता

चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यावर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. वाहने स्लिप होऊन अपघात होत आहे. काही नागरिकांनी घराचे बांधकाम करण्यासाठी रेती टाकली. ही रेती रस्त्यावर असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहे.

मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी

धानोरा : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मधसंकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे, परंतु याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

बीपीएल उत्पन्न मर्यादेची क्षमता वाढवा

चंद्रपूर : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिल्या जात आहे, परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने, बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक नागरिक बीपीएलपासून वंचित आहेत.

शिधापत्रिका अद्यावत करा

चंद्रपूर : सार्वजनिक वितरण प्रणाली अद्यावत करण्यासाठी राज्यात शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. शिधापत्रिकेवर नाव नाेंदणी हाेऊनही तीन ते चार महिन्यांपर्यंत संगणकीकरण हाेत नसल्याने लाेकांना धान्याचा लाभ मिळत नाही.