या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रवींद्र निकुरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या नयना गेडाम, ग्रामपंचायत सदस्य जयंत निकुरे आदींची उपस्थिती होती. एकात्मिक बालविकास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून ० ते ६ वयोगटातील मुलांच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी ही योजना राज्यात लागू आहे. बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासन विविध योजना, उपाययोजना राबवित असतो. महाराष्ट्र राज्यात शासकीय आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयात गरोदरपणी नाव नोंद केलेल्या व त्या ठिकाणी प्रसूती केलेल्या नवजात बालकांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी दोन हजार रुपयांच्या रकमेपर्यंत बेबी केअर किट बॅग मोफत उपलब्ध करून दिले जाते, असे जिल्हा परिषद सदस्या नयना गेडाम यांनी सांगितले. याप्रसंगी ७० किटचे सावरगावातील अंगणवाडींना वाटप करण्यात आले. संचालन अंगणवाडी सेविका दीपा चुनारकर यांनी केले.
सावरगाव येथे बेबी केअर किट बॅगचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रवींद्र निकुरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या नयना गेडाम, ग्रामपंचायत सदस्य ...
सावरगाव येथे बेबी केअर किट बॅगचे वाटप
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}