शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात हाजीच्या अटकेवर चर्चेचे गुऱ्हाळ

By admin | Updated: May 8, 2015 01:15 IST

घुग्घूस येथील कुख्यात गुंड हाजी सरवर याच्या अटकेवरील चर्चेचे गुऱ्हाळ चांगलेच रंगत आहे.

चंद्रपूर : घुग्घूस येथील कुख्यात गुंड हाजी सरवर याच्या अटकेवरील चर्चेचे गुऱ्हाळ चांगलेच रंगत आहे. पोलिसांनी त्याला अटक केली की त्याने स्वत:हून शरणागती पत्करली, ती नकोड्यात की नागपुरात, अशा विविध प्रश्नांवर सध्या पोलीस वर्तुळातच चर्चा झडत आहेत. काहींच्या मते अन्य गुंडांच्या टोळ्याकडून हाजीच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यातूनच स्वत:ला सुरक्षित करून घेण्यासाठी त्याने पोलिसांपुढे नागपुरात शरणागती पत्करल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने केलेला अटकेचा दावा खरा की पोलीस वर्तुळात सुरू असलेली चर्चा खरी, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. विविध गुन्ह्यांचे आरोप शिरावर घेऊन पोलिसांना गुंगारा देत गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात हाजी सरवर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला. मध्यंतरी नकोड्यात स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या अटकेसाठी फिल्डींग लावली होती. मात्र पोलीस खात्यातीलच काही मुखबीरांनी त्याला माहिती दिली. त्यातून तो पळून जाण्यात यशस्वी झाला. हाजीच्या अटकेनंतर त्याने स्वत: जिल्हा पोलीस अधिक्षकांपुढे दिलेल्या बयाणातून हे सत्य उजेडात आले. त्याची दखल घेत त्याच दिवशी पोलीस अधिक्षकांनी संबंधित पोलीस अधिकारी व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने उचलबांगडी केली. चंद्रपूर जिल्ह्यासह नागपूर परिसरातही गुन्हेगारीचे साम्राज्य उभे करणारा हाजी पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुन्हेगारी विश्वात अत्यंत सराईत म्हणून ओळख असलेल्या हाजीला परजिल्ह्यातील अन्य गुंडांच्या टोळ्यांशी वैर होते. घुग्घूस परिसरात कोळशाच्या तस्करीत त्याने चांगलाच जम बसविला होता. या व्यावसायिक स्पर्धेतून त्याचे अन्य गुन्हेगारी टोळ्यांशी नेहमीच वाद होत असत. यादरम्यान, हाजीचा अनेक गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलिसही हाजीच्या मागावर होते. पोलिसांचा वाढता दबाव आणि गुंडाच्या अन्य टोळ्यांकडून त्याला भीती होती. (प्रतिनिधी)