बंदीनंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 01:11 AM2019-09-01T01:11:34+5:302019-09-01T01:11:56+5:30

बाजारात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. ग्राहक सरस प्लास्टिक पिशव्यांची मागणी करीत आहे. काही काळ बंद झालेला प्लास्टिकचा कचरा आणखी वाढू लागल्याने शासकीय यंत्रणा प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीविषयी गांभीर्याने घेत नसेल का, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.

Despite the ban, the use of plastic bags increased | बंदीनंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

बंदीनंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

Next
ठळक मुद्देअनिर्बंध वापरावर अंकुश नाही, जनजागृती करण्याची गरजच

लोकमत न्यूज नेटवर्क
आयुधनिर्माणी : राज्यात प्लास्टिक बंदी केल्यानंतरही भद्रावती शहरामध्ये काही दुकानदारांकडून लपून-छपून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. यामुळे पर्यावरण संतुलन धोक्यात आले आहे. युज अँड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. दुसरीकडे नागरिकांकडून प्लास्टिकचा होणारा अनिर्बंध वापर, शासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याचेच द्योतक आहे. त्यामुळे लपूनछपून का, असेना प्लास्टिकचा वापर बोकाळलेला आहे.
शासनाने एक नोव्हेंबर २०११ पासून राज्यात प्लास्टिक बंदी केली. ३५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरावर कायद्याने बंदी आहे. मात्र बाजारात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. ग्राहक सरस प्लास्टिक पिशव्यांची मागणी करीत आहे. काही काळ बंद झालेला प्लास्टिकचा कचरा आणखी वाढू लागल्याने शासकीय यंत्रणा प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीविषयी गांभीर्याने घेत नसेल का, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. ठिकठिकाणी प्लास्टिकचा कचरा वाढू लागल्याने शासकीय यंत्रणेकडून प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आणावे, अशी मागणी पुढे येत आहे.
पानठेल्यांवरील खर्रा पन्न्या व प्लास्टिक पिशव्या वजनाने हलक्या असल्याने हवेबरोबर वाहत जाऊन जमिनीवर पसरतात आणि गुरे त्यांना चारा समजून खातात. त्यांच्या गळ्यात प्लास्टिक साचल्याने त्यांचा मृत्यू होतो. प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारे कोंबून पाणी साचते. गटारे निर्माण झाल्याने डासांची पैदास होऊन रोगराई निर्माण होते. एवढेच नाही तर प्लास्टिक जमीन, पाणी व अन्नसाखळी दूषित करतात. ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत हाणीकारक बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे.

जनावरांना धोका
शहरातील कानाकोपऱ्यात वसलेल्या अनेक पानठेल्यांवर खर्रा बांधून देण्यासाठी प्लास्टिक पन्नीचा वापर केला जातो. ग्राहक खर्रा खाऊन झाल्यावर प्लास्टिक पन्नी तशीच रस्त्यावर फेकून देतात. ती उडत रस्त्यावर आल्याने शहराच्या सौंदर्यात बाधा पडत आहे. भद्रावती पर्यटन नगरी असल्याने एकीकडे पालिका स्वच्छतेबाबत प्रयत्न करीत असताना दुसरीकडे रस्त्यावरील या पन्न्या शहराच्या सौंदर्यात बाधा आणत आहे. त्यातही प्लास्टि पिशव्यांचे विघटन होत नसल्याने त्या इतरत्र पडलेल्या दिसून येतात. बहुतेक जनावरे त्या चार म्हणून खातात. त्यामुळे जनावरांना धोका होण्याची शक्यता आहे. सद्या जनावरांच्या चाऱ्यांची मोठ्या प्रमाणात टंचाई सुरु आहे. परिणामी जनावरे शहरात मोकाट फिरताना आढळून येतात. त्यामुळे शहरात आढळलेल्या पिशव्यांचे सेवन करतात आहेत. त्यामुळे जनावरांना धोका होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे दिसून येत आहे.

कागदी पिशव्यांचा वापर करावा
साहित्य खरेदी केल्यानंतर त्याचे वहन करण्यासाठी बाजारात कागदी पिशव्याही उपलब्ध आहेत. मात्र बहुतेक दुकानदार व व्यावसायिक केवळ प्लास्टिक पिशव्याच वापर करीत आहेत. कागदी पिशव्या या पर्यावरण पुरक आहेत. मात्र प्लास्टिक पिशव्याने पर्यावरणाला हाणी पोहचते. मात्र तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचाच वापर सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जनजागृती करुन नागरिकांना कागदी पिशव्यांचा वापर करण्यास जागृत करावे.

Web Title: Despite the ban, the use of plastic bags increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.