शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

डांबर प्लांटला ग्रामस्थांचा विरोध

By admin | Updated: February 15, 2016 01:05 IST

सरपंचासह ग्रामपंचायत कमिटीची दिशाभूल करून उपसरपंचांनी बोरचांदली आणि लगतचा गावातील शेती तसेच ..

प्लांट झाल्यास आरोग्य धोक्यात : ना-हरकत रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारामूल : सरपंचासह ग्रामपंचायत कमिटीची दिशाभूल करून उपसरपंचांनी बोरचांदली आणि लगतचा गावातील शेती तसेच गावकऱ्यांसाठी भविष्यात धोकादायक ठरणारा डांबर प्लांट उभारण्यासाठी ना हरकत दाखला दिल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्लांट उभारण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.आर्थिक प्रलोभनाला बळी पडू उपसरपंचांनी सदर डांबर प्लॉटला नाहरकत दाखला दिला. परंतु याबाबत सरपंचाला तसेच ग्रामपंचायत कमिटीला कोणतीही माहिती दिली नसल्याचे ग्राम पंचायत सदस्य महेश कटकमवार, लोकनाथ मेश्राम, वासुदेव येनुगवार, सुनील येनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बोरचांदलीचे सरपंच उषा दुर्गे ही अनुसूचित जमातीची महिला असून अल्प शिक्षित असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंच गौरव पुपरेड्डीवार हेच चालवितात. आपला आर्थिक लाभ करुन घेण्यासाठी उपसरपंचांनी डांबर प्लांटमुळे होणाऱ्या प्रदुषणाच्या शेती आणि गावकऱ्यांचा आरोग्यावर भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांच्या विचार केला नाही. पुपरेड्डीवार यांनी अल्प शिक्षित सरपंचांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन ना-हरकत दाखल्यावर त्यांची सही घेऊन डांबर प्लांट मालकाकडून आर्थिक सौदेबाजी केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य आणि उपस्थित गावकऱ्यांनी केला.बोरचांदली गावाशेजारुन वाहणाऱ्या उमा नदीच्या तिरावर होत असलेला हा डांबर प्लांट अत्यंत धोकादायक असून यामुळे हवेचे तसेच पाण्याचे प्रदूषण होऊन ते शेती आणि गावकऱ्यांच्या आरोग्याला विपरीत परिणाम करणारे आहे. सदर डांबर प्लांटमुळे भयंकर प्रदूषण होणार असून सुमारे दहा किलोमीटरचा परीसर क्षेत्रात त्याचा परिणाम जाणवेल, अशी भीती येनुगवार यांनी पत्रकारांपुढे व्यक्त केली. डांबर प्लांट उभारण्यात येत असलेली जागा नदी किनाऱ्याला लागून असून पूरप्रवण क्षेत्रात येते. डांबर प्लांट मालक नदीतील पाण्याचा बेसुमार वापर करुन दूषित पाणी नदीमध्ये सोडण्याची शक्यता असल्याने नदीचे पाणीही दूषित होऊन त्यातील जीवजंतूंना धोका निर्माण होईल. सदर डांबर प्लांटला उपसरपंचांनी नाहरकत दाखल दिला असला तरी संपूर्ण गावकऱ्यांचा विरोध आहे. डांबर प्लांट होऊ नये यासाठी गावकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फतीने शासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. डांबर प्लांट उभारणीचे काम ताबडतोब बंद करण्यात न आल्यास गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला दिनकर येनूगवार, अमित येनगंटीवार, मयूर कावळे, दिनेश येनूगरवार, सचिन येलट्टीवार, निले, कटकमवार, अभिषेक पोरेड्डीवार, शैलेश कटकमवार, राजीव येनूगवार, मारकवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)