शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By admin | Updated: July 24, 2014 23:47 IST

शेतकरी शेतमजूर व बेरोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

चंद्रपूर : शेतकरी शेतमजूर व बेरोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व स्वराज्य शेतकरी सेवा संघाचे संस्थापक विश्वास कानफाडे, चंद्रपूर - गडचिरोली - वर्धा विभागीय अध्यक्ष मुन्ना तावाडे, विभागीय सचिव उमेश ना. करपे यांनी केले. शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे उपलब्ध करून द्यावी. कोरडा दुष्काळ जाहीर करावा, गतवर्षी अतीवृष्टी व पुराची नुकसान भरपाई द्यावी, शेतमालाला भाव द्यावा, कृषी पंपाना तातडीने वीज जोडणी करावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, चंद्रपूर जिल्ह्यात धूळखात असलेले लघूसिंचन तातडीने सुरू करावे, बेरोजगार भूमीपूत्रांना खाजगी उद्योगात जिल्ह्यातील नोकर भरती करण्यात यावी. कारखान्यांनीही भूमीपूत्रांनाच बेरोजगाराच्य खाईत लोटल्या जात असल्याची विदारक स्थिती आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी बांधवासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. मागील वर्षी आलेल्या अतिवृष्टीच्या मदतीची रक्कम अद्यापही अनेक शेतकरी बांधवाना मिळालेली नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील अनेक लघुसिंचन प्रकल्प धुळखात आहेत. दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्चूनही शेतीसाठी सिंचन उपलब्ध होत नाही. केवळ देखाव्यासाठी सिंचन प्रकल्प उभारले की काय अशी वास्तव स्थिती आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्या, अशी विनंती करण्यात आली.धरणे आंदोलनात अ‍ॅड. संजय अटकारे, रवी रायपुरे, राजू खुटे, विजेंद्र बक्सेरिया, आकाश बक्सेरिया, आदर्श खुटे, मारोती डोर्लीकर, पोर्णिमा लांडे, श्वेता मारेकर, अंजना क्षीरसागर, कलावती थेरे, शांताबाई पिदूरकर, विद्या कोकाटे, सुलक्षणा डेकाटे, मस्तान शेख, कालीदास देवगडे, बिरबल गुर्जल यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)