शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना वेळेत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:01 IST

शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचताना आर्थिक लाभाचा फायदा विलंबाने मिळणे हा मोठा अडथळा असल्याचे शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे कृषी विभाग व अन्य विभागांनी शेतकऱ्यांच्या योजना राबविताना वेळेचे बंधन पाळावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. सोमवारी प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत दोन तास चर्चा केल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : शेतकऱ्यांकडून जाणून घेतल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचताना आर्थिक लाभाचा फायदा विलंबाने मिळणे हा मोठा अडथळा असल्याचे शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे कृषी विभाग व अन्य विभागांनी शेतकऱ्यांच्या योजना राबविताना वेळेचे बंधन पाळावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. सोमवारी प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत दोन तास चर्चा केल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्रे मनोहरे, उपविभागीय कृषी अधिकारी दिगंबर तपासकर, वरोऱ्यांचे उपविभागीय कृषी अधिकारी जाधव, कृषी अधिकारी गणेश मादेवार, गटाचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. या सभेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मंजूर गटांना गटशेतीमधून देय अनुदानाच्या १५ टक्क्यांपर्यंत अनुदान गटांना तात्काळ वितरित करण्याच्या सूचना दिल्या. ज्या गटांचे सविस्तर प्रकल्प आराखडे मंजूर नाहीत अशा गटांच्या संबंधित उपविभागीय कृषी अधिकाºयांनी दोन दिवसात आढावा घेऊन सुधारीत सविस्तर प्रकल्प आराखडे जिल्हास्तरीय समितीला सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनीही मार्गदर्शन केले.या बैठकीला युवक बिरादरी बहुउद्देशीय शेतकरी बचतगट, अन्नपुर्णा स्वयंसहाय्य गिरगाव, अन्नपुर्णा स्वयंसहाय्य, युवक बिरादरी शेतकरी गट मूल, राजल्ला वाभीटकर, शेतकरी मित्र बचतगट खिरडी, सुधाकर जिवतोडे, किसानपुत्र शेतकरी स्वयंसहाय्य गट नंदोरी, नरेंद्र जिवतोडे, आबाजी ढुमणे, कृषी मित्र बचतगट सिंदी, पलिंद्र्र सातपुते, उमळपेठ फॉर्मर्स उधळपेठ, तात्यासाहेब मत्ते, वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामीण विकास गट कान्सा भाऊजी जाबोर, अन्नदाता शेतकरी बचतगट सुब्बई, श्री गुरूदेव ग्रामीण विकास संस्था नेदमापेठ, चिमूर फॉर्मस कंपणी चिमूर, संदीप कुटेमाटे, उन्नती शेतकरी पुरूष बचतगट पिपरी, हेमंत बोबडे, उन्नती शेतकरी पुरूष बचतगट, पिपरी, ए. एस. धनविजय, संजय एस येनुरकर तसेच गडिसुर्ला येथील कृषी विकास शेतकरी बचतगटाचे सदस्य व शेतकरी उपस्थित होते.कर्जासाठी प्रस्ताव सादर कराज्या शेती गटांनी कर्ज प्रकरणासाठी बँकेत प्रस्ताव सादर केला. अशा गटांनी माहिती कार्यालयाला कळवावे. त्या संबंधात बँकांचा लवकरच आढावा घेण्यात येईल. विभागीय कृषी सहसंचालकांनी गटांना सांगितलेल्या बाबी आराखड्यात घ्यावे व गरज वाटल्यास सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना उपस्थितांना दिल्या. गटांना आर्थिक विकासाकडे नेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्णत: मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Farmerशेतकरी