कोरोनाच्या जागृतीसाठी रस्त्यावर लिहिली घोषवाक्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:45+5:30

सावली नगरपंचायतीने शहरातील स्वच्छतेवर भर देत सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणचा परिसर, मुख्य रस्ते, शासकीय कार्यालय परिसराचे फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात आले. अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकान बँकेसमोर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी चौकोन आखून दिशा देण्याचा प्रयत्न केला. वारंवार आवाहन करूनही सुरक्षित अंतर ठेवण्यात आणि गर्दी कमी करण्यात नागरिक पुढाकार घेत नसल्याने रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी झाली नाही.

Declaration on the road to raise awareness of Corona | कोरोनाच्या जागृतीसाठी रस्त्यावर लिहिली घोषवाक्ये

कोरोनाच्या जागृतीसाठी रस्त्यावर लिहिली घोषवाक्ये

googlenewsNext
ठळक मुद्देसावली नगर पंचायतीचा उपक्रम : विनाकारण बाहेर जाऊ नका

लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडता का? विनाकारण फिरत असाल तर कुटुंब आणि शहराला धोक्यात आणत आहात, असा सल्ला विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना सावली नगर पंचायतीने दिला. शहरातील म. फुले चौक, बाजार चौक येथील रस्त्यावर संदेश लिहून जनजागृती केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावली नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे.
सावली नगरपंचायतीने शहरातील स्वच्छतेवर भर देत सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणचा परिसर, मुख्य रस्ते, शासकीय कार्यालय परिसराचे फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात आले. अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकान बँकेसमोर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी चौकोन आखून दिशा देण्याचा प्रयत्न केला. वारंवार आवाहन करूनही सुरक्षित अंतर ठेवण्यात आणि गर्दी कमी करण्यात नागरिक पुढाकार घेत नसल्याने रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी झाली नाही. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात २९ मार्चपासून अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त वाहनांना बंदी करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांना यातून मुभा दिली असून त्यांना पास देण्यात येत आहेत.

बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे. मात्र अनेकजण दुचाकी, किंवा पायदळ बाहेर निघत आहेत. तसेच चौकात बसत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात चौकात नाकाबंदी करण्यात येत असून कारवाई करण्यात येत आहे. तसेच तहसील कार्यालयाचे पथकसुद्धा शहरात फिरत असून कारवाई करीत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. त्याच्या अमंलबजावणीसाठी सावली नगर पंचायत प्रशासन प्रयत्न करीत आहे. आता जनजागृतीची उपाययोजना म्हणून रस्त्यावर घोषवाक्य लिहिण्यात आले आहेत.
- मनीषा वजाळे, मुख्याधिकारी नगर पंचायत, सावली

Web Title: Declaration on the road to raise awareness of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.