शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराच्या धुमाकुळाने धानाचे नुकसान

By admin | Updated: November 7, 2015 00:45 IST

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे धानपिक हाती येण्याच्या तयारीत असताना रानडुकरे शेतकऱ्यांच्या शेतात घुसून धानपिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत.

शेतकरी त्रस्त : वन्यप्राण्यांचा उभ्या पिकावर हल्लापोंभुर्णा : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे धानपिक हाती येण्याच्या तयारीत असताना रानडुकरे शेतकऱ्यांच्या शेतात घुसून धानपिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत. त्यामुळे हाती आलेल्या धान पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांना अख्खी रात्र जागून काढावी लागत आहे. प्राण्यांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करुन संबंधीत शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. तालुक्यातील देवाडा खुर्द, डोंगरहळदी, उमरी पोतदार, रामपूर दीक्षित, जामखुर्द, जामतुकूम, घनोटी, विहीरगाव, आंबेधानोरा, चेकहत्तीबोडी, कोसंबी रिठ, थेरगाव आदी गावासह अनेक गावात शेतकऱ्यांच्या शेतात रानटी डुकर व इतर जनावरे शिरुन धान पिकांच्या लोंब्याची नासाडी करीत आहेत. त्यामुळे स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. सदर परिसरातमध्ये केवळ धानपिकांवर कुटुंबाची उपजिविका होत असल्याने उत्पादन झाले नाही तर जगायचे कसे या भितीने शेतकरी जिवाची पर्वा न करता जंगली प्राण्यांच्या दहशतीमध्ये सुद्धा पिकाच्या रक्षणासाठी रात्रभर मारोशीवर जागून पिकाचे रक्षण करीत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून या परिसरामध्ये पाहिजे त्या प्रमाणात सिंचनाची सोय उपलब्ध नसल्याने केवळ निसर्गावर अवलंबून शेतीचे उत्पादन घ्यावेलागते. पाण्याअभावी परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे धानपिक करपायला लागले आहेत. दुसरीकडे काही प्रमाणात धानपिक तग धरुन असताना रानटी डुकरांच्या धुमाकुळाने नष्ट होणार की काय, या भितीने परिसरातील शेतकरी धस्तावला आहे. त्यामुळे खरीप हंगामात घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)