शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक दिन

By admin | Updated: March 17, 2016 01:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जागतिक ग्राहक दिन कार्यक्रम सोमवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच चंद्रपूरचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी होते.

चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जागतिक ग्राहक दिन कार्यक्रम सोमवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच चंद्रपूरचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्कीन, ग्राहक संरक्षण संघटना प्रतिनीधी सुधीर मिसार, ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्य ताराबाई पोटदुखे व ग्राहक जागृती संघाचे सचिव प्रभाकर धोपटे यांची उपस्थिती होती.ग्राहकांनी तक्रार करण्यासाठी काय करावे, तक्रार करण्याकरिता वकील करण्याची गरज आहे किंवा नाही याची संपूर्ण माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी यांनी ग्राहकांना दिली.ताराबाई पोटदुखे यांनी ग्राहक दिनाचे महत्त्व काय आहे, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या, हक्क कोणते आहे, कर्तव्य काय आहे, हे समजावून सांगितले. ग्राहकांनी वस्तू घेताना त्याची वॅरंटी-गॅरंटी, वस्तु पॅक आहे किंवा नाही, आय.एस.आय मार्क आहे किंवा नाही हे ग्राहकाने बघून नंतरच वस्तु घ्यावी, वस्तु घेतल्या नंतर त्याचे बील घ्यावे. जर वस्तुचे बील नसेल तर ग्राहकाला तक्रार दाखल करता येत नाही. ग्राहकांनी आपल्या हक्का सोबत आपले कर्तव्यपण बजावयाला पाहिजे, असे त्यावेळी त्यांनी सांगितले. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी शासनाकडून कोणते प्रयत्न केले जात आहे, याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्किन यांनी ग्राहकांना दिली. ग्राहक दिन कार्यक्रमामध्ये ग्राहकांनी आपल्या व्यथा व तक्रारी व्यक्त केल्या. गावागावात जागृती जनसप्ताह ठेवावा असे ग्राहकांनी सुचविले. संचालन पुरवठा निरीक्षक माने यांनी तर आभार निरीक्षक अधिकारी सतीश साळवे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)