शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खर्च कोट्यवधीचा ; तहान मात्र भागेना

By admin | Updated: December 15, 2014 22:53 IST

कोरपना तालुक्यातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी १९९८ ते २०१३ या काळात कोट्यावधीच्या योजना मंजूर करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात अनेक गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही.

कोरपना तालुका : अनेक पाणीपुरवठा योजना कुचकामीनांदाफाटा : कोरपना तालुक्यातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी १९९८ ते २०१३ या काळात कोट्यावधीच्या योजना मंजूर करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात अनेक गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. परिणामी नागरिक तहानलेलीच आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची झड तालुक्याला बसण्याची शक्यता आहे. तालुक्यात १९९८ पासून प्रादेशिक व वैयक्तिक गावाच्या योजना ५४ गावांसाठी मंजुर करण्यात आली. मात्र नंतरच्या काळात पाईपलाईन दुरूस्ती व काही कामे अर्धवट ठेवण्यात आल्याने बऱ्याच गावांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. त्याआधी पकडीगुड्डम धरणातील ०.५३ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करून १९९४ मध्ये निर्णय घेण्यात आला. यासाठी सोनुर्ली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली. याबरोबरच पिपर्डा गावातील नळ योजनेसाठी ३२ लक्ष रुपये खर्च करण्यात आले. मात्र अद्यापही या क्षेत्रातील गावांना पाण्याचा पुरवठा नियमित झालेला नाही. बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन फुटली असुन नागरिकांना दूषित पाण्याच्या पुरवठा होत आहे.मात्र, उपविभागीय अभियंत्यांनी साधी पाहाणी सुद्धा केलेली नाही. २००० ते २०१४ पर्यंत अनेक नळयोजनेची कामे प्रगतीपथावर असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. यात २०११ मध्ये कन्हाळगाव पाणीपुरवठा योजना, राजुरगुडा २००९, वनसडी २०११, शरद बु., इंजापूर, खिर्डी, पिपर्डा, पिपरी, धामणगाव या गावातील योजनांना मंजुरी मिळाली. यात लाखो रुपयाची कामे केल्याचा कांगावा करण्यात आला. मात्र तहान भागत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सन १९९८ मध्ये मंजुर झालेली मांगलहिरा, हिरापूर, नवेगाव, सोनुर्ली, अकोला, पिपरी, परसोडा आदी गावातील योजनाची अंमलबजावणी योग्यपणे झालेली नसल्याने व दुरुस्तीच्या कामात सदर विभागाने कानाडोळा केल्याने पाणीटंचाईला सामोेरे जावे लागत आहे. (वार्ताहर)