शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगाव प्रकल्पाच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार

By admin | Updated: March 19, 2016 00:41 IST

राजुरा तालुक्यातील सिंचन वाढविण्यासाठी तयार झालेल्या डोंगरगाव प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे.

शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांचा आरोप : कॅनलचे पाणी आल्यास शेती सरकारला दान देईनराजुरा : राजुरा तालुक्यातील सिंचन वाढविण्यासाठी तयार झालेल्या डोंगरगाव प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र या प्रकल्पाच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप धानोराचे शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांनी केला आहे. डोंगरगाव कॅनलचे पाणी धानोऱ्याला पोहचल्यास आपली शेती सरकारला दान देईन, असे आव्हान दोरखंडे यांनी प्रशासनाला दिला आहे. डोंगरगाव प्रकल्पाचे पाणी धानोऱ्याला येऊच शकत नाही. करोडो रूपयाचे काम करूनही शासकीय निधीचा दुरुपयोग सुरू आहे. या प्रकल्पासाठी कॅनलवर जेवढा खर्च होत आहे, तेवढ्या खर्चात धानोऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला दोन हातपंप दिले असते तर मुबलक पाणी मिळाले असते, असे दोरखंडे यांनी म्हटले आहे.अनेक वर्षापूर्वी प्रकल्पासाठी प्रशासनाने शेती घेतली. परंतु अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. आता चंद्रपूरचे कार्यालय मूलला गेले असून शेकडो शेतकरी मागील अनेक वर्षापासून डोंगरगाव प्रकल्पाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.धानोरा येथील तलाव खोदून तलावाची माती कॅनलसाठी वापरण्यात येत असून हजारो ब्रास माती रॉयल्टी शिवाय वापरण्यात येत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.‘रोजगार हमी, अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ या उक्तीप्रमाणे डोंगरगाव प्रकल्पापासून धानोरापर्यंत पाणी यावे यासाठी डोंगरगावपासून धानोरा पर्यंतचे कॅनलचे काम सुरू आहे. धानोरा येथील शेतकऱ्याच्या विहिरी बुजवून टाकल्या असून पंढरीनाथ दोरखंडे यांच्या विहिरीत माती टाकली, शेतातील मृर्ती माती टाकून जमिनीत पुरली. याबाबत विरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती पंढरीनाथ दोरखंडे, काशिनाथ झाडे, वसंत माहुलीकर, लहु टेकाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यांनी स्वत:च्या हक्कासाठी शेतकरी हवालदिल होत असताना शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)आत्महत्या करण्याच्या इशाराया कॅनलसाठी कवडीमोल किमतीमध्ये जमिनी घेतल्या. मात्र आता विहिरी बुजवून काम करणारे सिंचाई विभागाचे अधिकारी दादागिरी करीत असल्याचा आरोप पंढरीनाथ दोरखंडे यांनी केला आहे. कॅनलच्या कामात मोठी अफरातफर झाली असून याची चौकशी व्हावी व ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही त्यांना ३० मार्च पर्यंत रक्कम न दिल्यास या विभागाच्या पुढे आत्महत्या करण्याचा इशारा धानोऱ्याचे शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांनी दिला आहे.