शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांवर जाणीवपूर्वक अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपूर (ग्रामीण)चे जिल्हा अधिवेशन पोंभुर्णा येथील राजराजेश्वर सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. के. वाजपेयी, स्वागताध्यक्ष म्हणून न.प.च्या अध्यक्षा श्वेता वनकर तर प्रमुख अतिथी म्हणून राधेशाम पंचबुद्धे, अल्का आत्राम, सुभाष गोतमारे, शेंद्रे, सुनीता मॅकलवार, एकनाथ थुटे, मधुकर मुप्पीडवार, विलास बोबडे, रामदास गिरडकर, अमोल देठे, अधिवेशनाचे संयोजक दिलीप मॅकलवार आदींची उपस्थिती होती.

ठळक मुद्देनागो गाणार : पोंभूर्णा येथे पार पडले शिक्षकांचे जिल्हा अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : जुनी पेंशन योजना हा ज्वलंत विषय आहे. यासाठी माझा लढा सुरु आहे. शिक्षकांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असून जुनी पेंशन योजना जोपर्यंत लागू होत नाही. तोपर्यंत आमदारकीची पेंशन घेणार नाही. शिक्षक आमदार हा शिक्षकाच्या हक्कासाठी सदैव कार्यरत असला पाहिजे, असे मत आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपूर (ग्रामीण)चे जिल्हा अधिवेशन पोंभुर्णा येथील राजराजेश्वर सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. के. वाजपेयी, स्वागताध्यक्ष म्हणून न.प.च्या अध्यक्षा श्वेता वनकर तर प्रमुख अतिथी म्हणून राधेशाम पंचबुद्धे, अल्का आत्राम, सुभाष गोतमारे, शेंद्रे, सुनीता मॅकलवार, एकनाथ थुटे, मधुकर मुप्पीडवार, विलास बोबडे, रामदास गिरडकर, अमोल देठे, अधिवेशनाचे संयोजक दिलीप मॅकलवार आदींची उपस्थिती होती.कायदा बदलल्याशिवाय शिक्षण योजना अंमलात येत नाही. शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आपण आवाज उठवला आहे. शासन नवनवीन निर्णय घेत आहे त्यामुळे शिक्षकांनी आता जागृत राहणे गरजेचे आहे. संघटनेशी जुळून राहिले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर विविध शिक्षक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.प्रारंभी जिल्हा कार्यवाह रामदास गिरटकर यांनी संघटनेचे गित सादर केले. प्राथमिक विभागाचे अहवाल वाचन अमोल देठे तर माध्यमिक विभागाचे अहवाल वाचन रामदास गिरटकर यांनी केले.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, संचालन महिला आघाडी प्रमुख संध्या गिरटकर यांनी तर आभार जिल्हा सहकार्यवाह दिलीप मॅकलवार यांनी मानले. अधिवेशनाला जिल्हा परिषद, नगर परिषद, खाजगी अनुदानित, विनाअनुदानीत, आश्रमशाळा, कॉन्व्हेंट, प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनाची सांगता पसायदाणाने झाली.

टॅग्स :Teacherशिक्षक