शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड तालुक्यातील मतदार यादीत घोळ ! एका गावातील मतदारांची दुसऱ्या गावात नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:27 IST

Chandrapur : या प्रकारामुळे अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : सध्या देशात मतचोरी आणि मतदार यादीच्या गौडबंगालाविषयी मोठी चर्चा सुरू आहे. मात्र नागभीड तालुक्यात मतदार यादीचा वेगळाच घोळ समोर आला आहे. एका गावातील मतदारांची नावे दुसऱ्या गावात आणि परत त्या दुसऱ्या गावातील मतदारांची नावे तिसऱ्याच गावच्या यादीत टाकण्यात आल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.

मुद्राराक्षसाच्या दोषांमुळे नाव, आडनावात चुका होण्याची अनेक उदाहरणे आतापर्यंत ऐकिवात होती. परंतु एका गावातील बूथवर दुसऱ्या गावातील मतदारांची नावे टाकून परत त्याच गावातील बूथवर तिसऱ्या गावातील मतदारांची नावे टाकण्यात आली. ही बाब 'लोकमत'ने मागील लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या पूर्वसंध्येस उघडकीस आणली होती. ही चूक सरकारी बाबूंकडून झाली असली तरी झालेल्या या प्रकारास कंटाळून अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नव्हता.

आता मधल्या एका वर्षाच्या काळात प्रशासनाने या चुका दुरुस्त केल्या की, तशाच आहेत, याबाबत मतदार संभ्रमात आहे. यासंदर्भात तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्याशी संपर्क साधला मात्र संपर्क झाला नाही. 

या गावांमध्ये झाला होता सावळागोंधळ

  • देवपायली आणि सोनुली या दोन गावांची गट ग्रामपंचायत आहे. दोन गावांतील अंतर दीड किमी आहे. सोनुलीच्या मतदारांची नावे देवपायलीच्या बूथवर टाकण्यात कोणतीही हरकत नव्हती. मात्र सोनुलीच्या मतदारांची नावे ४ किमी अंतरावर असलेल्या राजुली येथील बूथवर तर राजुली येथील मतदारांची नावे बोंड येथील बूथवर टाकण्यात आली होती.
  • समाविष्ट आहेत. यातील पारडी बोंड गट ग्रामपंचायतीत ४ गावे गायमुख येथील मतदारांची नावे देवपायलीच्या बूथवर टाकण्यात आली आहेत. वास्तविक पारडी गायमुख गावास बोंड गाव अतिशय जवळ. मात्र पारडी येथील नावे तीन किमी अंतरावरील देवपायलीच्या बूथवर टाकण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
  • वासाळा मेंढा या ग्रामपंचायतीत वासाळा मक्ता हे गाव अंतर्भूत आहे. वासाळा मक्ता येथील नावे तेथेच हवी होती. मात्र येथील नावे ४ किमी अंतरावरील किटाळी मेंढा येथे समाविष्ट करण्यात होती. असेच प्रकार राजुली, नवानगर, पारडी ठवरे या गावासह आणखी अनेक गावांत घडले होते.
टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरVotingमतदान