शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन राज्यांच्या वादात शासनाच्या निधीचा चुराडा

By admin | Updated: March 16, 2016 08:35 IST

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील १४ गावांत दोन्ही राज्याची विकास यंत्रणा काम करीत आहे.

शंकर चव्हाण  जिवतीतेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील १४ गावांत दोन्ही राज्याची विकास यंत्रणा काम करीत आहे. येथील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना निवाऱ्याची सोय व्हावी, यासाठी केंद्र शासनाकडून घरकूल योजना राबविली जात आहे. मात्र या वादग्रस्त १४ गावातील नागरिक दोन्ही राज्याच्या वादात केंद्र शासनाच्या निधीचा लुटमार करीत असल्याचा गंभीर प्रकार गेल्या अनेक वर्षापासून येथे सुरू आहे. मात्र संबंधीत विभाग अजूनही झोपेतच आहे.वादग्रस्त १४ गावांचा वाद गेल्या २० वर्षापासून सुरू आहे. या ठिकाणी दोन्ही राज्याची विकास यंत्रणा राबत असून नागरिकही दोन्ही राज्याच्या योजनेचा फायदा घेण्यात मागे येत नाही. त्यासाठी भरमसाठ निधीही शासनाचा खर्च होतो आणि याच नागरिकांवर केंद्र शासनही खर्च करतो. दोन्ही राज्याचा वाद आहे, निधी खर्च होतो पण केंद्राचा काय, एकच लाभार्थी दोन्ही बाजुने लुटमार करतो, घरकुल एकच बांधतो आणि दोन घरकुलाचे बिल उचलतो, हा प्रकार गंभीर नाही का, राज्याच्या वादात केंद्र शासनाच्या निधीचा चुराडा होत नाही का, ही गगंभीर बाब आजपर्यंत कुठल्याच अधिकाऱ्यांच्या लक्षात आली नाही का, आली असेल तर मग त्या नागरिकांवर कार्यवाही का केली नाही, त्यात दलालाचा हात आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.यापूर्वी ‘लोकमत’ने काही गावांना भेटी देऊन ‘योजना दोन्ही राज्याच्या, घरकूल मात्र एकच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. या वृत्ताची सखोल चौकशी झाल्यास घरकुल योजनेत झालेला गौडबंगाल उघडकीस येईल, असे वाटत होते. मात्र असे काहीच झाले नाही. स्थानिक दलालावर याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे दलालही मुजोर बनत लाभार्थ्यांना हाताशी धरून केंद्र शासनाच्या निधीची लुटमार करीत असल्याचा प्रकार संबंधित अधिकारी उघड्या डोळ्याने बघतात, पण काहीच करीत नाही. त्यामुळे शासनाच्या निधीचा चुराडा होत आहे.