शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खेळ दाखविताना गारुड्याला सापाचा दंश

By admin | Updated: September 9, 2016 00:47 IST

अनेक समाज आपले पिढीजात असलेले पारंपारिक व्यवसाय करुन आपल्या परिवाराचे पालनपोषण करतात.

चिमूर : अनेक समाज आपले पिढीजात असलेले पारंपारिक व्यवसाय करुन आपल्या परिवाराचे पालनपोषण करतात. पुर्वजापासून अवगत केलेली साप पकडण्याची कला मारोती पत्रु नान्हे यांच्या संसाराचा गाडा चालविण्याचे साधन ठरले. मात्र अनेक वर्ष सापाचा खेळ दाखवून उपजिविका भागविण्यास मदत करणाऱ्या सापाने असाच खेळ दाखविताना दंश केल्याने गारुड्याला आपल्या जिवास मुकावे लागले. ही घटना चिमूर येथील नेताजी वॉर्डात मंगळवारी सकाळी घडली.चिमूर शहरातील नेताजी वॉर्डात नदीच्या किनाऱ्यावर एक लहानश्या झोपडीमध्ये वास्तव्य करणारे मारोती नान्हे यांच्या परिवारात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पुर्वजाकडून अवगत केलेली साप पकडण्याची कला व या सापाचा खेळ दाखवून परिवाराचा उदरनिर्वाह चालायचा. या कलेच्या माध्यमातून मारोतीने आजपर्यंत शेकडो सापांना पकडून जंगलात सोडले. त्यामुळे साप पकडणे व त्यांचा खेळ दाखविणे हे त्याचे नित्याचेच काम झाले होते. मारोती व साप हे दोघेही एकमेकांचे मित्र असल्यासारखे होते. मात्र हा सापच त्याच्या जीवनात काळ ठरणार, ही तिळमात्र कल्पना मारोतीला नव्हती. मंगळवारच्या सकाळी नेहमीप्रमाणे सापाची टोपली घेऊन मारोती घराबाहेर पडला. काही अंतर गेल्यावर नेताजी वॉर्डातील चौकात सापाचा खेळ दाखविण्यापूर्वीच साप टोपलीच्या झाकणाला धक्का देत बाहेर आला. तेव्हा मारोतीने सापाला हाताने पकडले. मात्र या सापाने गारुड्याच्या छातीला चावा घेतला. यामुळे काही वेळाने गारुडी मारोती नान्हे जमिनीवर कोसळले. आजूबाजूला जमलेल्या नागरिकांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचाराकरिता दाखल केले असता गारुड्याचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाला. (प्रतिनिधी)