शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या आठवणी जपण्यासाठी गावांना जवळ करा

By admin | Updated: January 12, 2016 00:54 IST

आपला जन्म ज्या गावात झाला, ज्या गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले,

सुधीर मुनगंटीवार : वढोलीत माजी विद्यार्थ्यांचा मेळावाचंद्रपूर: आपला जन्म ज्या गावात झाला, ज्या गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले, त्याच गावात बालपणी पुढील आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळाली व आपले संपूर्ण आयुष्य सत्कर्मी लागून आपण सुख समाधानाने जीवन व्यतीत करीत आहोत, त्याच गावातील आपल्या बालपणीच्या बालमित्रांची गळाभेट घेऊन एकमेकांच्या भावना जाणून घेण्याची संधी अशाप्रकारच्या माजी विद्यार्थी मेळाव्यातून व स्नेहमिलन सोहळ्यातून सहज शक्य होते. त्यासाठी प्रत्येकांनी जन्मगावाला जवळ करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.पंचायत समिती चंद्रपूर अंतर्गत पद्मापूर बीट व केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ५० वर्षे पूर्ण झाले. वढोली शाळेचे मुख्याध्यापक शुद्धोधन रुमाजी मेश्राम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व शाळेच्या सूवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लोकसहभागातून संपन्न झालेल्या माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहमिलन सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्नेहमिलन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम समिती सभापती देवराव भोंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण समितीचे सदस्य शांताराम चौखे, माजी जिल्हा परिषद सदस्य हंसराज रायपूरे, भवानी कन्स्ट्रक्शन चंद्रपूरचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ता रामपाल सिंग, दर्शन इरेक्टर्स चंद्रपूरचे संचालक शैलेंद्र कास्टीया, सोनू नागरकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, चंद्रपूर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी राजू आनंदपवार, गट ग्रामपंचायत पायली, भटाळीचे सरपंच मनिषा विनोद थेरे, उपसरपंच राजकुमार रायपूरे, ग्रा.पं. सदस्य सुजाता राजू सागोरे, हनुमान मडावी, कुंदा रामटेके, मनिषा गेडाम, पांडुरंग राजूरकर, राकेश गौरकार, बाबुराव मडावी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वढोली शाळेचे मुख्याध्यापक शुद्धोधन मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक विनोद थेरे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)