शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 00:52 IST

चंद्रपूर म्हटले की ताडोबा हे एक नाव डोळ्यापुढे येते. मात्र, गोंड साम्राज्याची वैभवशाली खूण असलेला येथील पराकोट, किल्ला मात्र उपेक्षित राहतो.

प्रेरणादायी उपक्रम : इको-प्रोची अविरत स्वच्छता मोहीमलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर म्हटले की ताडोबा हे एक नाव डोळ्यापुढे येते. मात्र, गोंड साम्राज्याची वैभवशाली खूण असलेला येथील पराकोट, किल्ला मात्र उपेक्षित राहतो. इको प्रो. नामक एका युवा संघटनेने ५५० वर्षे जुन्या किल्ल्यांची स्वच्छता मोहीम गेल्या ६८ दिवसांपासून अविरत सुरू ठेवली आहे. आपला इतिहास लख्ख स्वरूपात पुढे यावा, यासाठी नव्या पिढीची धडपड प्रेरणादायी ठरत आहे.चंद्रपूर शहर म्हणजे गोंडराजांची राजधानी. ५५० वर्षे जुन्या या राजधानीला ७ किलोमीटरचा भूईकोट किल्ला लाभला आहे. मात्र, लोकांच्या अनास्थेमुळे हा भुईकोट किल्ला नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इको प्रो या संस्थेच्या गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या श्रमदानातून या किल्ल्यास नवीन रूप मिळत आहे. चार भव्य दरवाजे, पाच खिडक्या, ३८ बुरुज आणि ७ किलोमीटर लांबीचा परकोट शहरात आहे. याच या भुईकोट किल्ल्यात गोंडराजांनी चंद्रपूर ही आपली राजधानी वसवली आणि जवळपास ३०० वर्षे राज्य केले. मात्र, हा ऐतिहासिक वारसा आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. चंद्रपुरातील युवांचा समावेश असलेल्या इको प्रो. नामक स्वयंसेवी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला साद देत हा ऐतिहासिक वारसा लख्ख स्वरूपात पुढे आणण्याचा चंग बांधला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून इको प्रो. या संस्थेचे ४० कार्यकर्ते अविरत परिश्रम करून शहरातील किल्ले आणि परकोट स्वच्छ करीत आहेत. कार्यकर्त्यांच्या या मेहनतीमुळेच आज किल्ल्यांना नवीन रूप मिळाले आहे. ६८ दिवसांआधी दिसणारा परकोट आज अगदी थक्क करणाऱ्या स्वरूपात लोकांपुढे आला आहे. भुईकोट किल्ला ताडोबाहून अधिक पर्यटक खेचून आणू शकतो. याकडे आजवर दुुर्लक्ष झाले. कधीकाळी या साडेसात किमी परकोटाची देखभाल आणि संरक्षण घोडदळाद्वारे केले जायचे, हे ऐकूनही खरे वाटत नाही. मात्र, आपल्या इतिहासाची माती करण्यात आपण सर्वच आघाडीवर असल्याचा इतिहास असल्याने चंद्रपूरच्या परकोटाचे व्हायचे तेच झाले. मात्र, या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व ओळखून राबविण्यात येणारे स्वच्छता अभियान ६९ व्या दिवसांत प्रवेशले असल्याने आतातरी नागरिक, प्रशासन आणि पुरातत्व खात्याने डोळे उघडावे, अशी कळकळीची अपेक्षा इको-प्रोच्या युवकांनी व्यक्त केली.