शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट बल्लारपूरसाठी धडपड

By admin | Updated: December 2, 2015 00:49 IST

स्वच्छ भारत- स्वच्छ महाराष्ट्र याप्रमाणेच स्वच्छ व सुंदर बल्लारपूर हे नगर परिषद प्रशासनाचे स्वप्न आणि ध्येय आहे.

जनसंपर्कातून नगर पालिकेची जागृती : नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईबल्लारपूर: स्वच्छ भारत- स्वच्छ महाराष्ट्र याप्रमाणेच स्वच्छ व सुंदर बल्लारपूर हे नगर परिषद प्रशासनाचे स्वप्न आणि ध्येय आहे. हे ध्येय गाठण्याकरिता स्वच्छतेबाबत सर्वांनी काळजी घेऊन इतरांनाही स्वच्छतेविषयी प्रवृत्त करावे, असे आवाहन बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी येथील जनतेला केले. स्वच्छता अभियानाअंतर्गत जनजागृती करिता न.प. सभागृहात एक सभा शुक्रवारी पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा छाया मडावी होत्या. चंदनसिंह चंदेल, नगरसेविका रेणूका दुधे, सिक्की यादव, विक्की दुपारे, कांता ढोके, महिला व बाल कल्याण सभापती वंदना तामगाडगे, कार्यालय अधीक्षक विजय जांभुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.या सभेत महिला संघटना, सामाजिक-सेवाभावी आणि शैक्षणिक संस्था, शिक्षक तसेच उद्योग प्रतिनिधींची उपस्थिती होती. या सर्वांना स्वच्छतेचे महत्व आणि त्याबाबत नगरपरिषदेकडून सुरु असलेले युद्धस्तरावरील कार्य आणि विशेष उपक्रम यांची माहिती देऊन या उपक्रमात सक्रिय भाग घेण्याची स्वच्छतेबाबत जागरुक राहण्याची विनंती न.प.कडून करण्यात आली. कचरा, निर्मूलन राष्ट्रीय कार्य असल्याचे यात आवर्जून सांगण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे आणि घंटागाडीत सुका व ओला कचरा वेगवेगळ्या पेटीत कसा टाकावा, जेणेकरुन संकलित झालेला कचरा निस्तारण्यासाठी सोयीचे जाईल याबाबत चित्रफितीद्वारा समजावून सांगितले. सुका व ओला कचरा वेगवेगळा कसा करायचा यावर त्यांनी मार्गदर्शन केले. आता हे सक्तीचे राहणार असून तसे न करणाऱ्यांवर दंडही ठोठावला जाईल, असे स्पष्टपणे मुख्याधिकारी यांनी सांगितले. उपस्थितांमधून काहींनी स्वच्छतेबाबत सूचना मांडल्या. नगराध्यक्षा मडावी, चंदनसिंह चंदेल, वसंत खेडेकर, रेणुका दुधे यांची ही भाषणे झालीत. संचालन व आभार प्रदर्शन विजय जांभुळकर यांनी केले. या सभेत महिलांची संख्या लक्षणीय होती. (तालुका प्रतिनिधी)