शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशाच्या घटना टाळण्यास नागरिकांनी पाळावी दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:01 IST

घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या बाजूला झाडाच्या फांद्या आल्या असल्यास त्या कापून टाकाव्यात. दारावरील तसेच भिंतीवरील भेगा बुजवाव्यात, अंधारात घराबाहेर पडताना नेहमी बॅटरीचा वापर करावा, खरकटे अन्न घराजवळ टाकू नये, खरकटे अन्न खाण्यासाठी उंदीर येतात व त्यांना खाण्यासाठी साप येतात. जंगलात किंवा शेतातून फिरताना पायात नेहमी बुट वापरावे, डोक्यावर टोपीचा वापर करावा.

ठळक मुद्देसर्पमित्रांचे आवाहन । रात्री फिरताना वापरावा टार्च

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मान्सून बरसला आहे. सोमवारपासून आद्रा नक्षत्राला सुरूवात होणार आहे. पावसाळ्यात दरवर्षी सर्पदंशाच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी पाळावी, असे आवाहन सर्पमित्र उमेशसिंग झिरे (मूल) व संतोष कोरडे (शंकरपूर) यांनी केले आहे.घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या बाजूला झाडाच्या फांद्या आल्या असल्यास त्या कापून टाकाव्यात. दारावरील तसेच भिंतीवरील भेगा बुजवाव्यात, अंधारात घराबाहेर पडताना नेहमी बॅटरीचा वापर करावा, खरकटे अन्न घराजवळ टाकू नये, खरकटे अन्न खाण्यासाठी उंदीर येतात व त्यांना खाण्यासाठी साप येतात. जंगलात किंवा शेतातून फिरताना पायात नेहमी बुट वापरावे, डोक्यावर टोपीचा वापर करावा. वाढलेल्या गवतातून जाणे शक्यतो टाळाव्यात अशा सूचना सर्पमित्र उमेशसिंग झिरे यांनी दिल्या. संतोष कोरडे म्हणाले, अडचणीच्या ठिकाणी किंवा अंधारात एखादी वस्तू शोधताना बॅटरी किंवा काठीचा आधार घ्यावा. जंगलात किंवा वाटेत दिसलेल्या सापाला उगाच मारण्याचा प्रयत्न करू नये. त्याला त्याच्या वाटेने सुखरूप जाऊ द्यावे, दाराची फट योग्य प्रकारे बंद करून ठेवावी, विटा, दगडाचे ढिगारे व पालापाचोळा साफ करताना काळजी घेवून साफ करावे, कोंबड्या, कबुत्तर, पोपट, ससे, आदी घरापासून दूर व उंचावर ठेवावेत. महिलांनी घर सावरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.दंश करून साप करतो स्वरक्षणसाप स्वत:हून कधीच दंश करीत नाही. त्याला स्वत:ला असुरक्षित वाटले तरच दंश करतो. त्यामुळे सापाच्या वाटेला जाणूनबुजून जाण्याचा प्रयत्न करू नये. रात्री झोपतेवेळी अंगावरुन साप गेला तरी तो दंश करीत नाही. मात्र अंगावर साप आल्यास आपण हलतो, त्यावेळी सापाला असुरक्षित वाटते व तो दंश करतो. रात्रीच्या सुमारास आपले भक्ष्य शोधण्यासाठी साप बाहेर निघतो. घराचा दरवाजा, खिडक्या या अतिशय व्यवस्थित बसलेल्या असाव्यात. एखाद्या ठिकाणी फट असल्यास ती फट बुजविणे आवश्यक आहे, अशी माहिती सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांनी दिली.

टॅग्स :snakeसाप