स्वयंपाकासाठी गॅसबरोबर चुलीचाही होतो वापर

By Admin | Updated: October 10, 2015 00:18 IST2015-10-10T00:18:48+5:302015-10-10T00:18:48+5:30

बदलत्या काळानुसार मातीच्या चुलीची जागा आता स्टोव्ह, गॅस तसेच इलेक्ट्रीक शेगड्यांनी घेतली आहे.

Chocolate was also used for cooking | स्वयंपाकासाठी गॅसबरोबर चुलीचाही होतो वापर

स्वयंपाकासाठी गॅसबरोबर चुलीचाही होतो वापर

घराघरांत गॅस : चुलीचे महत्त्व आजही कायम
खांबाडा : बदलत्या काळानुसार मातीच्या चुलीची जागा आता स्टोव्ह, गॅस तसेच इलेक्ट्रीक शेगड्यांनी घेतली आहे. तर स्वयंपाकाचा तसेच व विजेच्या वाढलेला दरामुळे ग्रामीण भागात चुलीचा वापर हा आजही होत आहे.
चुलीवरच्या अन्नाची चवही गॅस व इलेक्ट्रीक शेगडीवर बनविलेल्या जेवणात येत नाहीत, असे अनेक जण सांगतात. तीन दगडांवर अग्निच्या सहाय्याने अन्न शिजवून खाण्याचे मानवाला चुलीनेच शिकविले. त्यातून तीन दगडानंतर चुलीचे स्वरुप बदलून तिची जागा मातीच्या चुलीने घेतली.
त्यामुळे पुढे ग्रामीण भागात चूल सर्वत्र वापरली जात असत याचा वापर आजही सुरू आहे. भाकरीसाठी पीठ मळायचा घेऊन तव्यात टाकलेल्या दुसऱ्या भाकरीवरुन पाण्याचा हात फिरवल्यानंतर महिला चुलीतील दाटलेला विस्तव बाहेर काढून फुंकारीने फुंकून जाळ लावायच्या व उकरलेल्या आरावर भाकर फिरवायची असा प्रकार आजही ग्रामीण भागात दिसून येते.
चुलीमुळे होणारा धूर टाळण्यासाठी पुढे वातीचे स्टोव्ह, बॅनरचे स्टोव्ह, त्यांनतर काही काळ शासनाच्या निर्धर चुलीही आल्या व गेल्या. त्यानंतर शेगड्याच्या जमान्यात भुस्सा, कोळसा एवढेच अन्य इलेस्ट्रीकच्या शेगड्याही आल्या. मात्र सतत संघर्ष करीत का असेना शेगड्या टिकून राहिल्या आहेत. तर आज घराघरांत सिलिंडर पोहोचला असून गॅसचा वापर होत आहे. मात्र त्या घरात चूल पेटत नाही, असे नाही तर चुलीचाही वापर होत आहे.
जंगलातून लाकडे आणून चुलीवर स्वयंपाक आजही अनेकांच्या घरी कायम आहे. त्यामुळे चुलीचे मतत्त्व आजही ग्रामीण भागात दिसून येते. (वार्ताहर)

Web Title: Chocolate was also used for cooking