शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरात देशी दारुसह २० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:01 IST

बोलेरो पीकअप वाहनातून दारू तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे जांभुळघाट ते नेरी रोडवर सापळा रचण्यात आला. पीकअप वाहनाच्या पाठीमागून येणाऱ्या दुसºया स्विफ्ट वाहनाने समोरील दारूने भरलेल्या पीकअप वाहनाचा पाठलाग केला.

ठळक मुद्देएकाला अटक। उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : नागपूर येथून जांभुळघाटमार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर यांच्या दारूबंदी पथकातील पोलीस उपनिरीक्षक ग्यानेन्द्र तिवारी यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचून पीकअप वाहनासह तब्बल २० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करुन एकाला अटक करण्यात आली. रोहित कमलाकर पाटील रा. नंदोरी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मुख्य आरोपी नीतेश नवरखेडे रा. हिंगणघाट, दर्शन किन्नाके व पिकअप वाहनाचा चालकाविरुद्ध पोलीस स्टेशन चिमूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.ही कारवाई नेरी पोलीस चौकीच्या हद्दीतील गोरवात गाव परिसरात करण्यात आली.बोलेरो पीकअप वाहनातून दारू तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे जांभुळघाट ते नेरी रोडवर सापळा रचण्यात आला. पीकअप वाहनाच्या पाठीमागून येणाऱ्या दुसºया स्विफ्ट वाहनाने समोरील दारूने भरलेल्या पीकअप वाहनाचा पाठलाग केला. पोलिसांनी दारू पकडू नये, यासाठी लढवलेली ही युक्ती होती. यावेळी भरधाव कारने पथकातील वाहनास पीएससी चौक नेरी येथे ओव्हरटेक करून समोरून धडक दिली. घटनेची माहिती पोलीस स्टेशन चिमूरचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांना माहिती मिळताच ते आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. अवैध दारू वाहतूक करणाºया पिकअप वाहनाचा शोध घेत असताना वाहन चालकाने दारूचा माल पकडल्या जाऊ नये म्हणून वाहन गोरवट ते मोटेगाव रस्त्याच्या बाजूचे शेत शिवारामध्ये लपवून ठेऊन पळ काढला. मात्र, पोलिसांच्या शोधमोहिमेत शेतात उभे ठेवलेले पीकअप वाहन दिसताच पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता देशीदारूच्या १३९ पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी दारूसाठा आणि वाहन मिळून २० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.सदर कार्यवाही चिमुरचे पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे, पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम, पोलीस हवालदार विलास निमगडे, प्रवीण तिराणकर,पोलीस शिपाई कैलास आलाम, विनायक सरकुंडे, सुशील आठवले, सचिन खामनकर यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी