शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चिखली गाव कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:26 IST

चारजणांचा मृत्यू : गावात कोरोना संसर्ग वाढला मूल : तालुक्यातील चिखली हे गाव मागील काही दिवसांपासून तापाच्या आजाराने हैराण ...

चारजणांचा मृत्यू : गावात कोरोना संसर्ग वाढला

मूल : तालुक्यातील चिखली हे गाव मागील काही दिवसांपासून तापाच्या आजाराने हैराण झाले असून, गावातील ७० ते ८० लोकांनी कोरोना तपासणी केली असता, १२ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत, तर १५ दिवसांत चारजणांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या व्यक्तींमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण एकदम कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले. यामुळे उपविभागीय अधिकारी खेडकर यांनी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

कोरोनाच्या काळात चिखली गावात तापाची साथ मोठ्या प्रमाणात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती असल्याने व रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून मूलचे उपविभागीय दंडाधिकारी खेडकर यांनी एका आदेशानुसार चिखली हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून, गावातील मुख्य मार्गाला सील करण्यात येणार आहे. गावातील मुख्य मार्ग तथा ज्या वस्तीत जास्त रुग्णसंख्या आहे, तो भाग सील करण्यात येणार आहे. गावातील रुग्णांची संख्या लक्षात घेता आरोग्य प्रशासनाने तातडीने गावात आरोग्य शिबिर घेऊन सर्व घरांचे सर्वेक्षण करून ज्या घरात तापाचे रुग्ण वा इतर आजारांचे रुग्ण असल्यास त्यांची आरोग्य तपासणी करून गंभीर रुग्णाला तालुक्याच्या ठिकाणी नेवून उपचार करण्यात यावेत. सामान्य रुग्णांना गावातच ग्रामपंचायतीने तयार केलेल्या शाळेतील विलगीकरणामध्ये ठेवण्यात यावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. शासकीय अधिकाऱ्यांना शासनाच्या आदेशानुसार गावातच राहण्याच्या सूचना असतानासुद्धा चिखली येथील अधिकारी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणावरून रोज ये-जा करीत असतात. त्यामुळे शासनाने कामात दिरंगाई करण्याच्या कारणामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा गावातील नागरिकांकडून होत आहे.

गावातील मुख्य मार्ग सील होत असल्याने बाहेरगावच्या नागरिकांना येथे प्रवेशबंदी असणार आहे.