चिचपल्लीचे नाव जागतिक स्तरावर लौकिकप्राप्त ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:18+5:30

चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आज बांबू हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिट तसेच बांबू प्लाय युनिटचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, भाजपा नेते राजेंद्र गांधी, रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे, गौतम निमगडे, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील आदींची उपस्थिती होती.

Chichpalli's name will be globally famous | चिचपल्लीचे नाव जागतिक स्तरावर लौकिकप्राप्त ठरेल

चिचपल्लीचे नाव जागतिक स्तरावर लौकिकप्राप्त ठरेल

googlenewsNext
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बांबू हॅन्डीक्रॉफ्ट अ‍ॅन्ड आर्ट युनिटचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २०१३ मध्ये मी फक्त आमदार होतो. त्यावेळी बांबुवर आधारित उद्योग निर्मितीसाठी मी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. २०१४ मध्ये भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या दुसऱ्याच बैठकीत चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली, काम सुरू झाले व पूर्णही झाले. या केंद्रामुळे चिचपल्लीचे नाव जागतिक स्तरावर लौकीकप्राप्त ठरेल, याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन माजी अर्थ तथा वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आज बांबू हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिट तसेच बांबू प्लाय युनिटचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, भाजपा नेते राजेंद्र गांधी, रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे, गौतम निमगडे, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, मी बघितलेले स्वप्न साकार करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले, त्यांचे अभिनंदन करतो. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून यापुढील काळातही मोठे काम आपल्याला करायचे आहे. जेव्हा आपण एखादा उद्योग सुरू करतो तेव्हा तो फक्त रोजगार निर्मिती करत नाही तर त्या माध्यमातून त्या परिसराचा नावलौकीकसुध्दा वृध्दींगत होतो. बांबुपासून तिरंगा ध्वज, तलवार अशा विविध वस्तु तयार करण्यात आल्या. पहिला तिरंगा ध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी भेट देवू शकलो, याचा मला विशेष आनंद आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या बांबूपासून तयार होणाºया इमारतीची दखल सिंगापूरच्या प्रसार माध्यमांनी घेतली. विविध प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मानकरी हे केंद्र ठरले. ही बाब विशेष अभिमानास्पद आहे. गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनिय असे काम करत वनविभागाला विशेष लौकिक प्रदान केला, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी केले. बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बांबुच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यात आल्याचे सांगत माजी वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात एक अद्वितीय उपक्रम या भागात आम्ही राबवू शकलो, याचा विशेष आनंद असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Chichpalli's name will be globally famous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.