शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली शुल्कवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:01 IST

शाळा व महाविद्यालये बंद असल्याने अनेक खासगी शाळांच्या शिक्षकांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरु असल्याने शाळांचे खर्च कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत खासगी शाळांनी या शालेय वर्षात शुल्क न वाढविण्याचा निर्णय जरी घेतला तरी त्यांचासमोर शुल्क वसुलीचा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपालकांची मागणी : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य अडचणीत असल्याने शुल्क कमी करावे

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा-महाविद्यालय बंद आहेत. परंतु, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा व महाविद्यालयांनी ऑनलाईन क्लासेस घेण्यास सुरू केले आहे. ठराविक वेळेत व्हाट्सअप, झूम, मोट व वेबेक्स या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. पालकांना शुल्क वसुलीचा तगादा लावू नये, असे शासनाचे निर्देश असूनही ऑनलाईन शिक्षण सुरु असल्याचे कारण पुढे कडून शाळेकडून शुल्क वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे.शाळा व महाविद्यालये बंद असल्याने अनेक खासगी शाळांच्या शिक्षकांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरु असल्याने शाळांचे खर्च कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत खासगी शाळांनी या शालेय वर्षात शुल्क न वाढविण्याचा निर्णय जरी घेतला तरी त्यांचासमोर शुल्क वसुलीचा पेच निर्माण झाला आहे. राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार कुठल्याही खासगी शाळांना पालकांना शुल्क वसुली करता तगादा न लावण्याचा आदेश असूनसुद्धा शासनाच्या नियमांना धाब्यावर ठेवून खाजगी शाळेतर्फे ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली पालकांना शुल्क भरण्याकरता मेसेज पाठवण्यात येत आहे. अनेक शाळांतर्फे पूर्ण फी भरल्यास दहा टक्के सूट देण्याची ऑफरसुद्धा देण्यात आली आहे. सद्यस्थितीत अनेक पालकांची आर्थिक स्थिती खालावलेली असताना खासगी शाळांना शुल्क कमी करण्याची मागणी होत आहे.पालक शुल्क भरण्यास तयार आहेत. मात्र शाळा व कॉलेज बंद असल्यामुळे खासगी शाळांचे अनेक खर्च कमी झाले आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने खासगी शाळांनी कमी शुल्क आकारावे.- महेंद्र बेताल, उपाध्यक्षपालक-शिक्षक समिती, बामणीलॉकडाऊन संपेपर्यंत कुठल्याही खासगी शाळेने पालकांना शुल्क वसुली करता तगादा लावू नये, तसे दिशानिर्देश शासनातर्फे प्रत्येक शाळेला देण्यात आले आहे.- वर्षा फुलझेले, गटशिक्षणाधिकारी, बल्लारपूर

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण