शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास, होऊ शकतो घरात कायमचा अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST

चंद्रपूर : वीजबिल वाचविण्यासाठी काही जण मीटरमध्ये छेडछाड करीत महावितरणसह स्वत:ची फसवणूक करतात. यामध्ये जर महावितरणला ही चोरी आढळून ...

चंद्रपूर : वीजबिल वाचविण्यासाठी काही जण मीटरमध्ये छेडछाड करीत महावितरणसह स्वत:ची फसवणूक करतात. यामध्ये जर महावितरणला ही चोरी आढळून आल्यास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो. एवढेच नाही, तर त्याच्या घरात कायमचा अंधार होऊ शकते. त्यामुळे मीटरमध्ये फेरफार करण्यापूर्वी एकदा विचार केलेला बरा.

महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि कृषी ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. किती वीज जळते, यासाठी ग्राहकांच्या घरी वीज मीटर लावला जातो. विशेष म्हणजे, मीटर लावण्यापूर्वी घरातील इलेक्ट्रिक साहित्य किती याचाही अंदाज घेतल्या जातो. मात्र, काही ग्राहक यामध्ये फेरफार करतात. यामुळे कधी मीटर फॉल्टी दाखवतात, तर काही ग्राहकांकडे अत्यंत कमी युनिट जळल्याचे मीटरमध्ये दाखवतात. वीजबिल चुकविण्यासाठी केलेली ही फेराफेरी ग्राहकांना जेलची वारी घडवू शकते. भारतीय विद्युत कायद्याच्या कम १३५, १३८, १२६ अंतर्गत संबंधितांवर गुन्हाही दाखल करून, वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो.

बाॅक्स

वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

२०१९-

२०२०-

२०२१-

बाॅक्स

अधिकारी म्हणतात....

ग्राहक वीजचोरी करीत असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. आपणच आपली फसवणूक करतो, हे त्या ग्राहकाच्या लक्षात येत नाही. वीजचोरी, मीटर मध्ये फेरफार आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. यामध्ये संबंधिताला शिक्षाही भोगावी लागते.

- अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी

बाॅक्स

मीटर जप्ती अन् ५० हजारांपर्यंत दंड

ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळल्यास मीटर जप्त केले जाते. यामध्ये संबंधितांकडून मागील दोन वर्षांपर्यंतचे बिल वसूल केले जाते. यामध्येही दंडाची रक्कम भरावी लागते. दंड न भरल्यास पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून गुन्हा नोंद केला जातो.

बाॅक्स

कधीही होऊ शकते मीटरची तपासण

वीज वितरण कंपनी वीज मीटर लावून देताना एक फार्म भरून घेते. यामध्ये घरातील इलेक्ट्रिक वस्तू, बल्बचा किती वापर केला जाणार, या संदर्भात माहिती घेतली जाते. यानुसार, संबंधित ग्राहकाचे किती वीज युनिट जळू शकेल, याचा अंदाज लावला जातो. जर यामध्ये तफावत आढळली, तर अधिकारी केव्हाही वीज ग्राहकाकडील वीज मीटरची तपासणी करू शकतात. सोबतच एखाद्याने तक्रार केल्यास याचीही दखल घेतली जाते.