शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

धूळ प्रदूषणामुळे चंद्रपूरकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा प्रदूषणामध्ये वरचा क्रमांक आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्या प्रश्न उभा ठाकला असतानाच आता रस्त्यांच्या कामामुळे होणाऱ्या धुळीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. येथील नागपूर रोड पाण्याच्या टाकीपासून तर वरोरा नाकाचौकापर्यंत रस्ता खोदण्यात आला आहे. त्यातच वरोरा नाका उड्डाण पुलाचे कामही सुरु आहे.

ठळक मुद्देजागोजागी रस्त्यांचे खोदकाम : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रदूषणामध्ये अव्वल असलेल्या चंद्रपुरातील नागरिकांना सध्या रस्त्यांच्या खोदकामामुळे होणाऱ्या धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांचे काम त्वरित करून या धुळीपासून मुक्तता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा प्रदूषणामध्ये वरचा क्रमांक आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्या प्रश्न उभा ठाकला असतानाच आता रस्त्यांच्या कामामुळे होणाºया धुळीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. येथील नागपूर रोड पाण्याच्या टाकीपासून तर वरोरा नाकाचौकापर्यंत रस्ता खोदण्यात आला आहे. त्यातच वरोरा नाका उड्डाण पुलाचे कामही सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. या रस्त्याबरोबरच आंबेडकर महाविद्यालय ते सिंधी पंचायतपर्यंत रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावरही सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. धुळीमुळे या परिसरातील नागरिक अशरक्ष: या रस्त्याच्या कामाला कंटाळले आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील बंगाली कॅम्प ते सावरकर चौकापर्यंतही काम सुरु आहे.चंद्रपूर शहरातील विविध भागात सुरु असलेल्या रस्ता बांधकामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. लहान बालके तसेच विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बांधकाम परिसरातील रस्त्यांवर किमान पाणी शिंपडावे. जेणेकरून धुळीचे प्रमाण काही प्रमाणात का, होईना कमी होईल.- सतीश चहारे, चंद्रपूरविकास कामे करा, मात्र त्या कामामध्ये गती हवी. जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात कामाला गती नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यांचे कामे त्वरित करून दिलासा देणे गरजेचे आहे.-बंडू लोहट, स्थानिक नागरिक चंद्रपूरवॉर्डावॉर्डातही धूळचंद्रपूर शहरात विविध विकास कामे सुरु आहे. कुठे सिमेंट रोड तर कुठे नाल्यांचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे जागोजागी रस्त्याचे खोदकाम सुरु आहे.परिणामी सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. विशेष म्हणजे, दिवसभर काम सुरु राहत असल्याने जाण्यायेण्यासाठीही मोठी अडचण निर्माण होत आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण