शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर-वर्धा-यवतमाळ जिल्ह्यातील शेती धरणात जाणार

By admin | Updated: March 13, 2016 01:10 IST

२३ वर्षांपूर्वी अत्यल्प मोबदल्यात दिंदोडा प्रकल्पाकरिता शासनाने जमिनी घेतल्या. या जागेवर धरणाचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

वरोरा : २३ वर्षांपूर्वी अत्यल्प मोबदल्यात दिंदोडा प्रकल्पाकरिता शासनाने जमिनी घेतल्या. या जागेवर धरणाचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाढीव मोबदला मिळावा, याकरिता चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष करीत आहे. परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्याच्या कुठल्याही हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत नसल्याने वरोरा तालुक्यातील दोन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. यामुळे प्रशासनात चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून येत आहे.१९९३ मध्ये चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील ३३ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प मोबदला देऊन दिदोंडा प्रकल्पाकरिता प्रशासनाने घेतल्या. हा मोबदला अत्यल्प असल्याने काही शेतकरी न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले होते. यामध्ये न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकारी कार्यालयाची जप्ती करण्यात आल्याची घटना घडली होती. प्रारंभी या जमिनी निप्पान डेन्रो कंपनीने ताब्यात घेतल्या होत्या. त्यावेळी मोबदला दिल्यानंतरही सातबारावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे नाव होते. काही महिन्यापूर्वी प्रशासनाने यानंतर दिदोंडा धरण बांधण्याच्या हालचाली सुरू करीत सातबारावर पाटबंधारे विभाग महाराष्ट्र शासन असे नाव करण्यात आले. यावेळीसुद्धा प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शवीत वाढीव मोबदला देण्याची मागणी करीत लोकप्रतिनिधींना साकडे घातले. परंतु वाढीव मोबदला मिळाला नाही. आता पुन्हा धरणाच्या कामाला प्रारंभ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. धरणाचे काम सुरू झाल्यास वाढीव मोबदला मिळणार नाही. त्यामुळे १ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरसमोर आत्मदहन करण्याची परवानगी वरोरा तालुक्यातील केळी गावातील प्रकल्पग्रस्त अमोल ठाकरे, धीरेंद्र इंगोले यांनी प्रशासनाकडे मागितली आहे. प्रशासनाने आता त्यांचे बयान नोंदविणे सुरू केले आहे. (तालुका प्रतिनिधी)