शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ईदच्या मिरवणुकीने चंद्रपूर दुमदुमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:01 IST

ईद ए मिलादुन्नबी चंद्रपूरसह जिल्ह्यात मोठ्या हर्षोउल्लासात साजरा झाला. ईद ए मिलादुन्नबीनिमित्त चंद्रपुरात शनिवारपासूनच उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चंद्रपुरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. हजारो मुस्लिम बांधव मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीने शहर दुमदुमले.

ठळक मुद्देजिल्हाभरातही विविध कार्यक्रम : हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये एकात्मतेचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इस्लाम धर्माचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलादुन्नबी चंद्रपूरसह जिल्ह्यात मोठ्या हर्षोउल्लासात साजरा झाला. ईद ए मिलादुन्नबीनिमित्त चंद्रपुरात शनिवारपासूनच उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चंद्रपुरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. हजारो मुस्लिम बांधव मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीने शहर दुमदुमले.यावेळी हिंदू, मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन एकात्मतेचा परिचय दिला. ईद ए मिलादनिमित्त शुक्रवार सकाळपासूनच चंद्रपुरात उत्साहाचे वातावरण होते. मिरवणुकीची सुरुवात सकाळी १० वाजता गांधी चौकातून करण्यात आली. जटपुरा गेट, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातून परत जटपुरा गेट, गिरणार चौक अशी मिरवणूक फिरल्यानंतर दारुल मोहम्मदिया मस्जिद दादमहल वॉर्ड येथे विसर्जित झाली. या मिरवणुकीत हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर सर्वांनी लंगरचा लाभ घेतला. जिल्ह्यातील अनेक शहरातही ईद ए मिलादनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.मिरवणुकीचे ठिकठिकाणीस्वागतमिरवणुकीच्या स्वागतासाठी मंगळवारी रात्रीच प्रमुख मार्गावर मंच उभारण्यात आले होते. शुक्रवारी मिरवणूक निघताच विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षाच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी मसालेभात व सरबतही वितरण करण्यात आले. काही जणांनी रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था केली होती.युवकांची स्वच्छता मोहीममिरवणुकीदरम्यान होणारा कचरा तत्काळ स्वच्छ करण्यासाठी युवकांची एक चमू कार्यरत होती. मिरवणूक ज्या मार्गावरून गेली, त्या मार्गावर हे युवक स्वच्छता मोहीम राबवित होते. त्यामुळे मिरवणूक विसर्जित झाल्यानंतर लगेच शहर स्वच्छ दिसत होते.मिरवणुकीचे जोरगेवारांकडून स्वागतमुस्लीम बांधवांतर्फे शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी कस्तुरबा मार्गावर स्वागत केले. यावेळी, आमदार जोरगेवार यांनी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मौलाना यांचे पुष्पहार, शॉल देऊन स्वागत केले. तसेच, सर्व मुस्लीम बांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या मुस्लिम समाज बांधवांना आयस्क्रिम वाटप करण्यात आले. याप्रसंगी, अनवर अली, राशीद हुसैन, इमरान शेख, शफीक काजी, खालीद खान, जावेद खान, अशपाक खान, सलीम शेख, राजिक खान आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Socialसामाजिक