शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील गुन्हे अन्वेषण विभागाचा कारभार नागपुरातून !

By admin | Updated: July 9, 2014 23:21 IST

महत्वपूर्ण गुन्ह्यांच्या तपासामध्ये मोलाची भूमिका बजाविणाऱ्या चंद्रपुरातील गुन्हे अन्वेषण विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. केवळ दोन हवालदारांच्या बळावर सुरू असलेल्या चंद्रपुरातील

डीवायएसपी नाही : पोलीस निरीक्षकाचेही पद रिक्तचचंद्रपूर : महत्वपूर्ण गुन्ह्यांच्या तपासामध्ये मोलाची भूमिका बजाविणाऱ्या चंद्रपुरातील गुन्हे अन्वेषण विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. केवळ दोन हवालदारांच्या बळावर सुरू असलेल्या चंद्रपुरातील या कार्यालयाचा कारभार अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे नागपुरातून चालविला जात आहे.चंद्रपुरातील सीआयडी क्राईम अर्थात गुन्हे अन्वेषण विभागात चार पदे आहेत. यात डीवायएसपी आणि पोलीस निरीक्षक प्रत्येकी एक आणि दोन हवालदारांचा समावेश आहे. असे असले तरी सध्या फक्त दोन हवालदार कार्यरत आहेत. येथील डिवायएसपी जी.आर. आढाव यांची बदली ३१ मे रोजी ठाणे ग्रामीणला झाली. तेव्हापासून नवीन अधिकारी मिळालाच नाही. अन्य अधिकाऱ्याकडेही या पदाचा चार्ज दिलेला नाही. त्यामुळे नागपुरातील सीआयडी क्राईमच्या मुख्यालयातून सध्या चंद्रपूरचा कारभार चालविला जात आहे. पोलीस निरीक्षकाचे पद तर गेल्या पाच वर्षांपासून रिक्त आहे. कुणी अधिकारी यायला तयार नाही. त्यामुळे कामाची सर्व धुरा दोन हवालदारांवर आली आहे.अलिकडच्या काळात ब्रम्हपुरीतील दुहेरी हत्याकांडाचा तपास करून प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचविण्याची भूमिका या विभागाने पार पाडली होती. सध्या अधिकारीच नसल्याने केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम तेवढे सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)