शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयात खुर्च्या रिकाम्या

By admin | Updated: May 15, 2015 01:05 IST

येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांच्या रिक्त पदांमुळे बहुतांश कामाचा खोळंबा होत आहे.

नागभीड : येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांच्या रिक्त पदांमुळे बहुतांश कामाचा खोळंबा होत आहे. आज गुरुवारी तहसील कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी हजर नव्हता. त्यामुळे कामासाठी तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले.येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदाराची चार पदे मंजूर आहेत. पण विविध कारणांमुळे तीन पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. एक नायब तहसीलदार येथे कार्यरत होते. पण त्यांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे ते सुद्धा रजेवर गेले असल्याचे सुत्राने सांगितले. नागभीड तालुक्याचा पसारा मोठा आहे. गिरगाव पासून तर मौशीपर्यंत या तालुक्याचा व्याप असून ११२ गावांचा या तालुक्यात समावेश आहे.सध्यास्थितीत शासनाने विविध योजना सुरू केल्या त्याचबरोबर अनेक योजनांचे विकेंद्रीकरणही केले आहे. या योजनांसाठी आणि वैयक्तिक कामासाठी रोजच शेकडो नागरिकांची तहसील कार्यालयात ये-जा सुरू असते. अशाच कामासाठी गुरूवारी अनेक नागरिक येथील तहसील कार्यालयात आले. पण एकही जबाबदार अधिकारी हजर नसल्याने त्यांना आल्या पावली परत जावे लागले.दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीने यासंदर्भात माहिती घेतली असता येथील तीन नायब तहसीलदाराची पदे रिक्त आहेत. तर तहसीलदार श्रीराम मुंदडा शासकीय बैठकीला ब्रह्मपुरी येथे गेल्याची माहिती मिळाली. गुरुवार हा दिवस येथील बाजाराचा दिवस असल्याने काम घेवून येणाऱ्यांची संख्या गुरुवारी अधिक असते. त्यामुळे निदान सोमवारी आणि गुरुवारी जबाबदार अधिकाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित असावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)