शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्र दिले; मालकी हक्क नाही

By admin | Updated: January 12, 2016 00:52 IST

राजुरा तालुक्यातील सिर्सी व कोलामगुडा (मूर्ती) येथील आदिवासी शेतकऱ्यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी

आदिवासींची थट्टा : वनजमीन प्रकरणराजुरा : राजुरा तालुक्यातील सिर्सी व कोलामगुडा (मूर्ती) येथील आदिवासी शेतकऱ्यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वन हक्क मान्य करणे) नियमाप्रमाणे सन २००९-१० ला ताब्यात असलेल्या वन जमिनीचे व वन हक्काचे प्रमाणपत्र देण्यात आले. परंतु त्यानंतरची मोजणी करून ताब्यात असलेल्या वन जमिनीच्या मालकी हक्काचा सातबारा अद्यापही देण्यात आला नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजनेच्या लाभापासून वंचित आहे.सिर्सी येथील पोचू भिमा सोयाम, मेंगु राजम शिडाम, आनंद भिमा सोयाम, तानाजी पत्रू कोडापे, अंजनाबाई गणपत सोयाम, भीमराव पोला सोयाम व इतर ३० तसेच कोलामगुडा (मूर्ती) येथील भीमराव सोयाम व इतर २५ यांना वन हक्क प्रमाणपत्राचे वाटप सन २००९-१० मध्येच करण्यात आले. त्यानंतर मोजणी करून ताब्यात असलेल्या वन जमिनीचा मालकी हक्काचा सातबारा मात्र अद्यापही देण्यात आला नाही. यासाठी प्रमाणपत्रधारकांनी राजुरा तहसील कार्यालयात पाच वर्षापासून पायपीट सुरू ठेवली आहे. परंतु त्यांचा कोणीच वाली नसल्यामुळे मालकी हक्काच्या सातबारापासून हे आदिवासी बांधव वंचित आहेत. त्यामुळे शासनाच्या विविध योजनेच्या लाभाअभावी त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची पाळी आली आहे. शासकीय अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी उपोषणाचा इशारा आता त्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)