सीसीआयतर्फे खरेदी केंद्र सुरू करणार

By Admin | Updated: November 16, 2015 00:56 IST2015-11-16T00:56:05+5:302015-11-16T00:56:05+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून कापूस उत्पादन शेतकऱ्यांना आवश्यकता असूनही त्यांच्या उत्पादनाची खरेदी करण्याची उपयुक्त व्यवस्था नसल्याने

CCI will start the shopping center | सीसीआयतर्फे खरेदी केंद्र सुरू करणार

सीसीआयतर्फे खरेदी केंद्र सुरू करणार

शेतकऱ्यांना दिलासा : हंसराज अहीर यांचा पुढाकार
चंद्रपूर : गेल्या अनेक वर्षांपासून कापूस उत्पादन शेतकऱ्यांना आवश्यकता असूनही त्यांच्या उत्पादनाची खरेदी करण्याची उपयुक्त व्यवस्था नसल्याने त्यांना त्यांचे उत्पादन खासगी व्यापाऱ्यांना पडेल किंमतीत विकण्याची पाळी येत होती. याची दखल घेत केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कापूस उत्पादकांना केंद्र सरकारने घोषित केलेल्या किमान बाजारमूल्य भावाने खरेदी केंद्र उपलब्ध करून देवून त्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी केंद्र सरकारच्या उपक्रम असलेल्या भारतीय कपास निगम लिमिटेडच्या माध्यमाने आपल्या क्षेत्रात कापूस उत्पादकांना त्यांचा कापूस तातडीने विक्री करून देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होत असून या कापूस उत्पादकांना खरेदीची शाश्वती नसल्याने त्यांच्या उत्पादनाच्या खासगी व्यापाऱ्यांकडून अनुचित लाभ घेतल्या जात होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने असे नुकसान टाळून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या किमान बाजारमुल्य भावाचा फायदा मिळावा, याकरिता भारतीय कपास निगम लिमीच्या अध्यक्ष तथा प्रबंध निदेशकांशी प्रत्यक्ष चर्चा करून पूर्व विदर्भातील कापूस उत्पादक क्षेत्रात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने भारतीय कपास निगम लिमी.ने राजुरा, वरोरा, घाटंजी, पांढरकवडा, कापसी, नांदुरा, वरुड, पुलगाव व वडनेर येथे खरेदी सुरू केली आहे.
भारतीय कपास निगमतर्फे सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची कापूस प्रमाणीकरणच्या नावाने कर्मचाऱ्यांनी लूट करू नये, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर देण्यासाठी भारतीय कपास निगमने आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य आदेश निर्गमीत करावे. कापूस खरेदीत शेतकऱ्यांची कोणत्याही कारणामुळे झालेली फसवणूक यापुढे सहन करण्यात येणार नाही याची दक्षता घेवून कापूस खरेदी शेतकऱ्यांना फायदेशीर व्हावी याकरिता केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी संबंधितांना आवश्यक निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: CCI will start the shopping center