शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची कसोटी

By admin | Updated: October 6, 2014 23:10 IST

सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच सर्व प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणुका निर्णय घेतला असल्याने रिंगणात उमेदवारांची संख्या वाजवीपेक्षा जास्त आहे. वाढत्या महागाई सोबतच

राजकुमार चुनारकर - खडसंगी सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच सर्व प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणुका निर्णय घेतला असल्याने रिंगणात उमेदवारांची संख्या वाजवीपेक्षा जास्त आहे. वाढत्या महागाई सोबतच निवडणुकीचा खर्चही अमाप वाढला आहे. मात्र यंदाची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना २८ लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा आयोगाने आखून दिली असल्याने त्यांना २८ लाख रुपयात विधानसभेचा संपूर्ण खर्च निपटविण्याची कसरत करावी लागणार आहे.२००९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्च तब्बल १३ लाख रुपयांनी वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना देण्यात आलेली खर्चाची मर्यादा आता २८ लाख करण्यात आली आहे. ही मर्यादा मागच्या निवडणुकीत १५ लाख होती. त्यासोबतच यंदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची अनामत रक्कम दुप्पट करून १० हजार रुपये करण्यात आली आहे. असे असले तरी आरक्षित संवर्गातील उमेदवारांना मात्र निम्मीच अनामत रक्कम भरावी लागली. अनुसूचीत जाती जमाती संवर्गातील उमेदवारांना ही रक्कम गेल्या निवडणुकीत अडीच हजार रुपये होती.पाच वर्षापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपासून आतापर्यंतच्या कालखंडात महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.१२ व्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि आघाडी या दोन्ही फाटाफुट झाली असल्याने जवळपास सर्वच प्रमुख पक्षाने स्वतंत्र विधानसभा निवडणुका लढवित आहेत. त्यामुळे उमेदवार अधिक आणि कार्यकर्ते कमी, अशी काहीशी अवस्था सध्या सर्वच मतदार संघात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी उमेदवारांना खर्चाचा हात सैल सोडावा लागत आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख उमेदवारांना मोठा खर्च करावा लागणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा वाढवून जवळपास दुप्पट केली असली तरी या निर्धारित रकमेत निवडणुकीचा खर्च करणे उमेदवारांना शक्य होणार नाही. त्यामुळे झालेला खर्च २८ लाखांच्या मर्यादेत बसविण्याकरिता व रोजच्या खर्चाचा ताळेबंद सादर करण्याकरिता सर्वच उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती बऱ्याच मतदार संघात सारखी असली तरी आयोगाने वाढवून दिलेल्या या खर्च मर्यादेमुळे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मात्र अच्छे दिन आल्याचे चित्र दिसत आहे.