जपून करा ऑनलाईन खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 05:00 AM2019-10-22T05:00:00+5:302019-10-22T05:01:03+5:30

दिवाळी या सणाला आपल्या आवडता रंगाची डिझायनची आणि लेटेस्ट फॅशनच्या वस्तू, कपडे आणि भरपूर अशा गोष्टी लक्षांत इंटरनेटवर आपल्याला पहायला मिळतात आणि खरेदीही करता येतात. पण या आवडत्या वस्तू इंटरनेटवरून ऑनलाईन शॉपिंग करताना तुमची फसवणूक होऊ शकते. अशा स्थितीत शॉपिंग करताना डेबिट कार्डचा वापर सजगतेने करावा. अन्यथा फसवणुकीला सामोर जावे लागतील, असा इशारा बºयाचदा सायबर पोलिसांनी दिला आहे.

Buy Online Shopping Carefully | जपून करा ऑनलाईन खरेदी

जपून करा ऑनलाईन खरेदी

Next
ठळक मुद्देफसवणूक टाळा : ऑफरचा नाद धोक्याचा, पासवर्ड सजगतेने वापरा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दिवाळीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताना सावधानता बाळगा, नाही तर ऐन दिवाळीतच आपले दिवाळे निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या ऑनलाईन खरेदी आणि वाढता इंटरनेटचा वापर लक्षात घेता दिवाळीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे ऑफलाईनला हुरळून न जाता सजग राहणे गरजेचे आहे.
दिवाळी या सणाला आपल्या आवडता रंगाची डिझायनची आणि लेटेस्ट फॅशनच्या वस्तू, कपडे आणि भरपूर अशा गोष्टी लक्षांत इंटरनेटवर आपल्याला पहायला मिळतात आणि खरेदीही करता येतात. पण या आवडत्या वस्तू इंटरनेटवरून ऑनलाईन शॉपिंग करताना तुमची फसवणूक होऊ शकते. अशा स्थितीत शॉपिंग करताना डेबिट कार्डचा वापर सजगतेने करावा. अन्यथा फसवणुकीला सामोर जावे लागतील, असा इशारा बºयाचदा सायबर पोलिसांनी दिला आहे.
ऑनलाईन शॉपिंग तस काही गैर नाही. पण तुमच्या एका लहानशा चुकांमुळे तुमच्या शिखातील हजारो रूपये तुम्हाला गमवावे लागतील. त्यामुळे सजग राहणे गरजेचे आहे.

सायबर कॅफेमधून वस्तू बूक करू नका
वस्तुची किंमत चुकती करण्यासाठी जर आपण एखाद्या कार्डचा वापर करणार असलो तर हे कार्ड ज्या कंपनीचे आहे तिची अशी बाबतीतील सुरक्षितता किती आहे, हेही आपल्याला माहिती असावी. व्हिसा कार्ड वापरताना पासवर्ड विचारला जातो. किंवा एक चार आकडी संख्या मोबाईलवर पाठवली जाते. तिला वन टाइम पासवर्ड असे म्हणतात. याचेच संक्षिप्त स्वरूप म्हणजे ओटीपी हा वापरल्यानंतरच आपला व्यवहार पूर्ण होतो. या प्रकारची सुरक्षितता नेटबँकींगमार्फत किमंत चुकती केल्यास लागू होते. मात्र, हे व्यवहार सायबर कॅफेतून करू नये. कारण अशा ठिकाणी आपली पासवर्डसारखी गुप्त माहिती चोरणाºया छुप्या प्रणाली बसवल्याची शक्यता असते.

अशी घ्या काळजी
सर्वप्रथम ज्या वेबसाईटवरून तुम्ही वस्तू खरेदी कराल, त्या वेबसाईटच्या सर्वात खालच्या ठिकाणी सर्टिफिकेट दिलेले आहे की नाही हे तपासा. आॅनलाईन खरेदी सुरक्षितरीत्या कशी करावी, याबाबत माहिती घ्यावी ज्या कंपनीचे प्रॉडक्ट खरेदी करायचे आहे. त्या कंपनीची आॅनलाईन खरेदीसंदर्भातील माहिती तपासावी. ऑनलाइन प्रॉडक्ट विकणाºया कंपनीची किंवा वेबसाईटची सत्यता तपासून पाहावी.

असे व्यवहार करू नका
शक्यतो थेट तुमच्या बँकेशिवाय आणि ऑनलाईन खरेदी कंपनीशिवाय वेबसाईटवरून आर्थिक व्यवहार करू नयेत. मौल्यवान वस्तू स्वस्तू दरात विकली जात असेल तर शक्यतो ती पूर्ण माहिती आणि खात्री झाल्याशिवाय विकत घेऊ नये. खरेदी केलेल्या वस्तुंचे पैसे परत मिळत असतील किंवा वस्तू बदलून मिळत असतील तरच ऑनलाईन खरेदी करा. ऑनलाईन खरेदीत आपल्या के्रडीट किंवा डेबिट कार्डचा पीन देऊ नका, सीसीटीव्ही नंबर आणि कार्डच्या मागील सिक्युरिटी नंबर ग्रीड नंबर देऊ नका ही सर्व माहिती तुम्ही स्वत: भरा ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही किमान हे नियम जरी पाळल्यास होणाऱ्या ऑनलाईन खरेदीच्या धोकाधळीच्या फसवणुकीत बचाव करू शकाल.

Web Title: Buy Online Shopping Carefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.