शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

जळणाऱ्या रोहित्रांवर राहणार नजर

By admin | Updated: November 23, 2014 23:16 IST

अनधिकृत वीज वापर, जास्त क्षमतेचे कृषी पंप वापर यामुळे रोहित्रे जळत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांसोबत महावितरणला बसत आहे. यावर उपाय म्हणून महावितरण

चंद्रपूर : अनधिकृत वीज वापर, जास्त क्षमतेचे कृषी पंप वापर यामुळे रोहित्रे जळत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांसोबत महावितरणला बसत आहे. यावर उपाय म्हणून महावितरण आता जळणाऱ्या रोहित्रांची झडती घेणार आहे.
क्षेत्रीय कार्यालयांना अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागपूर परिमंडळात चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या परिमंडळात २४ हजार रोहित्रे आहेत. मुळात रोहित्र अतिभारीत असल्याशिवाय जळत नाही. विजेचा अनधिकृत वापर किंवा मंजूर भारापेक्षा जास्त क्षमतेच्या मोटारीचा वापर झाल्यामुळे रोहित्रे जळतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी अनधिकृत वापरावर वीज चोरीची कारवाई करावी, वीज चोरी थांबविल्याशिवाय रोहित्र देऊ नये, अशा स्पष्ट सूचना यापूर्वीच क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.
नागपूर परिमंडळात येणाऱ्या चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात १ हजार २९० रोहित्रांमध्ये बिघाड आला. रोहित्रात बिघाड आल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. तक्रारींच्या आधारे एक हजार २६५ रोहित्रांची दुरुस्ती महावितरणतर्फे करण्यात आली. अजूनही काही रोहित्रांच्या दुरुस्तीचे काम महावितरणतर्फे सुरू आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने आता महावितरणने जळणाऱ्या रोहित्रांची झडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसा अहवाल पाठविण्याचे निर्देशही क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले. यात संबंधितांची जबाबदारी निश्चित करता यावी, यासाठी महावितरण मुख्यालयाने ज्या भागात रोहित्र जळाले आहे, ते गाव, विभाग, उपविभाग, उपविभागाचे प्रमुख आणि रोहित्राची जबाबदारी असलेल्या लाईनमनचे नाव याबाबतचा रोहित्र निहाय तपशील दररोज मुख्यालयात पाठविण्याच्या सुचना दिल्या आहेत. या माहितीचा अभ्यास करून पुढील कारवाई केली जाणार आहे. महावितरणच्या नव्या निर्देशामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची डोकेदुखी आणखीनच वाढणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)