शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

विहीरगावजवळ ‘द बर्निंग कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 6:00 AM

राजुरा येथील कुणाल विजय लांडगे आणि वैशाली राजेश रुनिवाल हे मारुती व्हॅन (क्रमांक एमएच ३४ सीएन २२०९) मध्ये कपडे, स्टेशनरी सामान तसेच बेन्टेक्सचे सामान भरून विविध गावात फिरून माल विक्री करण्यासाठी निघाले होते. मूर्ती या गावातून परत राजुराला जात असताना चनाखा गावाजवळ व्हॅनमधील कपडयांना अचानक आग लागली. पाहता पाहता आगीचा भडका झाला.

ठळक मुद्देमहिला जखमी कार जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कविहीरगाव : मारुती व्हॅनला अचानक आग लागल्याने गाडीसह गाडीतील कपडे आणि स्टेशनरी जाळून खाक झाल्याची घटना राजुरा तालुक्यातील चनाखा - विहिरगाव मार्गावर गुरुवारी दुपारी घडली. यात गाडीतील एक महिला किरकोळ जखमी झाली. सुदैवाने जिवितहानी झाली नाही.राजुरा येथील कुणाल विजय लांडगे आणि वैशाली राजेश रुनिवाल हे मारुती व्हॅन (क्रमांक एमएच ३४ सीएन २२०९) मध्ये कपडे, स्टेशनरी सामान तसेच बेन्टेक्सचे सामान भरून विविध गावात फिरून माल विक्री करण्यासाठी निघाले होते. मूर्ती या गावातून परत राजुराला जात असताना चनाखा गावाजवळ व्हॅनमधील कपडयांना अचानक आग लागली. पाहता पाहता आगीचा भडका झाला. प्रसंगावधान पाहून गाडीतून पटकन उतरून गाडीतील कपडे काढण्याचा प्रयत्नात वैशालीला किरकोळ दुखापत झाली. परंतु डोळ्यादेखत ती गाडी आणि त्यातील सामान पूर्णता जळून खाक झाले. या ठिकाणाजवळ कुठेही आग विझविण्याचे साधन उपलब्ध नव्हते. मात्र नंतर अग्निशमन वाहन आले. तोपर्यंत सर्व जळून खाक झाले.या आगीत सुमारे एक लाख ८० हजार रुपयांचे साहित्य आणि सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीची व्हॅन जळाली. याचीे माहिती होताच पाहण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी झाली होती. दरम्यान, विरुर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक एस.टी. वडतकर आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. 

टॅग्स :fireआगcarकार