विहीरगावजवळ ‘द बर्निंग कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:38+5:30

राजुरा येथील कुणाल विजय लांडगे आणि वैशाली राजेश रुनिवाल हे मारुती व्हॅन (क्रमांक एमएच ३४ सीएन २२०९) मध्ये कपडे, स्टेशनरी सामान तसेच बेन्टेक्सचे सामान भरून विविध गावात फिरून माल विक्री करण्यासाठी निघाले होते. मूर्ती या गावातून परत राजुराला जात असताना चनाखा गावाजवळ व्हॅनमधील कपडयांना अचानक आग लागली. पाहता पाहता आगीचा भडका झाला.

 'The burning car' near Vihargaon | विहीरगावजवळ ‘द बर्निंग कार’

विहीरगावजवळ ‘द बर्निंग कार’

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला जखमी कार जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
विहीरगाव : मारुती व्हॅनला अचानक आग लागल्याने गाडीसह गाडीतील कपडे आणि स्टेशनरी जाळून खाक झाल्याची घटना राजुरा तालुक्यातील चनाखा - विहिरगाव मार्गावर गुरुवारी दुपारी घडली. यात गाडीतील एक महिला किरकोळ जखमी झाली. सुदैवाने जिवितहानी झाली नाही.
राजुरा येथील कुणाल विजय लांडगे आणि वैशाली राजेश रुनिवाल हे मारुती व्हॅन (क्रमांक एमएच ३४ सीएन २२०९) मध्ये कपडे, स्टेशनरी सामान तसेच बेन्टेक्सचे सामान भरून विविध गावात फिरून माल विक्री करण्यासाठी निघाले होते. मूर्ती या गावातून परत राजुराला जात असताना चनाखा गावाजवळ व्हॅनमधील कपडयांना अचानक आग लागली. पाहता पाहता आगीचा भडका झाला. प्रसंगावधान पाहून गाडीतून पटकन उतरून गाडीतील कपडे काढण्याचा प्रयत्नात वैशालीला किरकोळ दुखापत झाली. परंतु डोळ्यादेखत ती गाडी आणि त्यातील सामान पूर्णता जळून खाक झाले. या ठिकाणाजवळ कुठेही आग विझविण्याचे साधन उपलब्ध नव्हते. मात्र नंतर अग्निशमन वाहन आले. तोपर्यंत सर्व जळून खाक झाले.
या आगीत सुमारे एक लाख ८० हजार रुपयांचे साहित्य आणि सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीची व्हॅन जळाली. याचीे माहिती होताच पाहण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी झाली होती. दरम्यान, विरुर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक एस.टी. वडतकर आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
 

Web Title:  'The burning car' near Vihargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :firecarआगकार