शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परवाना शुल्क वाढीमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत

By admin | Updated: November 5, 2015 01:29 IST

गौण खनिजांच्या वाहतुक परवाना शुल्कात आणि दंडात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याने गौण खनिज वाहतुकदारांचे

नागभीड : गौण खनिजांच्या वाहतुक परवाना शुल्कात आणि दंडात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याने गौण खनिज वाहतुकदारांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची वाहणे उभी असल्याने त्यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न तर निर्माण झालाच आहे पण त्याचबरोबर वाहनांची किस्त भरण्याचेही वांदे आले आहेत.नागभीड तालुका हा उद्योग विरहीत तालुका आहे. त्यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या शेकडा ९० टक्के तरुणांना बेकारीचेच जीवन जगावे लागते. यावर उपाय म्हणून काही तरुणांनी वित्तीय संस्थांच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी करून गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला होता. यात काहींनी जमही बसवला होता. मात्र मागील तीन महिन्याअगोदर रेती, मुरुम आणि इतर गौण खनिजांच्या वाहतूक परवान्यात शासनाने मोठ्या प्रमाणावर वाढ केल्याने संपूर्ण बजेटच बिघडून गेले आहे.मागील वर्षी ज्या १०० फुट (एक ब्रॉस) रेतीचा परवाना ४०० होता, तो परवाना शुल्क आता ८०० रुपये करण्यात आला आहे. मुरुम २०० रुपये होता तो आता ४०० रुपयावर नेऊन ठेवण्यात आला आहे. गिट्टीसुद्धा २०० ची ४०० रुपये करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकदारांचे कंबरडेच मोडले आहे. यावर उपाय म्हणून काही वाहतुकदारांनी लपूनछपून हा व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दंडाची आकारणीही करण्यात आली आहे. शासनानेच या दंडात विक्रमी वाढ केली आहे. पूर्वी एखाद्या व्यावसायिकाने अवैध वाहतूक केली तर १०० फुट रेती-गिट्टीवर ३२०० रूपये दंड आकारण्यात येत होता. आता यात वाढ करून तो ५४०० रूपये करण्यात आला आहे. हीच अवैध वाहतूक रात्रीच्या वेळी पकडण्यात आली तर या दंडाचे वेगळेच ‘रेट’ असल्याची माहिती आहे. वाढविण्यात आलेला परवाना शुल्क आणि दंडामुळे या तालुक्यातील वाहतुकदार अडचणीत आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)परवाना शुल्क वाढीमुळे केवळ वाहतूकदारच अडचणीत आले, असे नाही तर सर्व सामान्यांनाही याचा फटका बसत आहे. अनेकांच्या घरांचे बांधकाम थांबले आहे. अनेकांचे बजेट बिघडले आहे. बांधकाम व्यवसायात असलेल्या लोकांवर बेकारी ओढवली आहे.- रवी आंबोरकर,माजी उपसरपंच, नागभीड